लिमा,
दक्षिण अमेरिका खंडातील पेरूमध्ये मोठा फेरबदल झाला असून, उपराष्ट्राध्यक्षाला देशाचे प्रमुखपद बहाल करण्यात आले आहे. एका मोठ्या राजकीय घडामोडीत राष्ट्राध्यक्ष Pedro Castillo पेड्रो कॅस्टिलो यांच्यावर महाभियोगाचा खटला चालवून त्यांना पदावरून हटवण्यात आले. बुधवारी 130 सदस्यीय संसदेत महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने 101 मते पडली.
तर, Pedro Castillo पेड्रो कॅस्टिलो यांना समर्थनार्थ केवळ सहा मते मिळाली. 10 सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला नाही. यानंतर उपराष्ट्राध्यक्ष डिना बोलुआर्टे यांना नवे राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आले. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असून, 2026 पर्यंत पदावर राहतील. दरम्यान, लिमा पोलिसांनी राजधानी पेड्रो कॅस्टिलो यांना अटक केली आहे.