अंजनगावात पुन्हा रिव्हॉल्व्हर जप्त

काडतूससह आरोपीला अटक

    दिनांक :08-Dec-2022
|
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
केवळ चार दिवसात Anjangaon जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा एक रिव्हाल्व्हर आणि सहा जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात रिजवान उर्फ सोनू अहमद खान रा. पान अटाई खिडकीपुरा अंजनगाव सुर्जी या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
 
Anjangaon
 
अंजनगाव सुर्जी Anjangaon येथे चार डिसेंबर रोजी पोलिसांनी तीन रिव्हाल्व्हरसह आठ जिवंत काडतुस लगतच्या लखाड गावातून जप्त केल्या होत्या. या प्रकरणात मोहम्मद नावेद उर्फ गुड्डू अब्दुल सलीम या 30 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असताना बुधवारी रात्री पोलिसांना शहरातील रिजवान या युवकाकडे रिव्हाल्व्हर आणि काडतुस असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शहरातील पानअटाई , खिडकीपुरा या परिसरात राहणार्‍या रिजवानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्या रिव्हाल्व्हर होती, मात्र पोलिसांनी चार दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतर भीती वाटल्यामुळे ती फेकून दिली असल्याची माहिती त्याने दिली.
 
 
तोफनालाच्या पुलाखाली रिव्हाल्व्हर
दरम्यान रिजवान Anjangaon याने आपल्याकडे असणारी रिव्हाल्व्हर आणि सहा काडतुस अंजनगाव ते परतवाडा मार्गावर असणार्‍या गळती गावाजवळील तोफनाल्यावरील पुलाच्या खाली लपवली असल्याची माहिती पोलिसांना दिली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तोफनाल्याच्या खाली असणारी रिव्हाल्व्हर आणि सहा काडतुस शोधून काढले. या प्रकरणात रिजवानला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली. लगतच्या काही गावांमध्ये अनेक घरांमध्ये रिव्हाल्व्हर आणि काडतुस सापडण्याची शक्यता आहे.
 
 
गॉड फादर शोधण्याची गरज
पिस्टल आणि काडतुस अवैध मार्गाने आणून त्याची विक्री करणे या Anjangaon प्रकरणातील आरोपींच्या मागे कुणीतरी गॉड फादर असल्याची चर्चा शहरात असून त्याबाबतची सखोल चौकशी करण्याची मागणी शहरातील नागरिक करीत असून या गुन्हेगारांच्या पाठीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे अत्यंत जरुरीचे आहे. सदर गुन्ह्यातील प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, पोलीस उपविभागीय अधिकारी सत्येंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दीपक वानखडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड, पोलीस कर्मचारी विजय शेवतकर, कमलेश मुराई, जयसिंग चव्हाण, विशाल थोरात, शुभम मारकड, देवानंद पालवे करीत आहेत.