एसटीच्या 145 बसेस हजारो भाविकांसह कर्नाटकातून सुरक्षित परतल्या

    दिनांक :08-Dec-2022
|
- येलम्मा देवीची वार्षिक जत्रा
 
मुंबई, 
येलम्मा देवीच्या वार्षिक जत्रेसाठी राज्यातील जवळपास सात हजार भाविकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथे घेऊन गेलेल्या सर्व 145 ST buses returned बसेस आज सकाळी भाविकांसह कोल्हापुरात सुरक्षितरीत्या परतल्या आहेत. दोन राज्यांमध्ये उफाळलेल्या सीमावादामुळे भाविकांची चिंता लागली होती. या भाविकांनी जत्रेत भाग घेण्यासाठी सोमवारी सौंदत्ती येथे बसमधून प्रवास केला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकार्‍याने दिली.
 
 
st karnatak
 
बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागवाडी येथील टोलनाक्याजवळ मंगळवारी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर सीमावाद चिघळला होता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यात कर्नाटकातील किमान चार बसेसची तोडफोड केल्याचा आरोप आहे. एकूणच परिस्थिती पाहता, एसटीने स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्नाटकात दररोज चालवल्या जाणार्‍या त्यांच्या 1,156 सेवांपैकी 382 सेवा मंगळवारी दुपारपासून निलंबित केल्या. सुमारे सात हजार भाविकांना घेऊन दुरुस्तीचे ट्रक आणि तपासणी पथकांचा समावेश असलेल्या ST buses returned सर्व 145 एसटी बसेस गुरुवारी पहाटे कर्नाटकातून पोलिस संरक्षणात सुरक्षितपणे कोल्हापुरात पोहोचल्या, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.