चार दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट

    दिनांक :08-Dec-2022
|
-नाशिक-सिन्नर महामार्गावरील अपघातात तीन ठार
 
नाशिक, 
नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. शिंदे पळसे टोल नाक्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विचित्र अपघातात बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत जागेवरच ST fire पेट घेतला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नाशिकपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. दरम्यान, एसटी बस एक चार चाकी आणि तीन ते चार दुचाकी वाहनांमध्ये हा अपघात झाला.
 

ST took fire 
 
अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात कशामुळे घडला याबाबत अजून समजू शकले नाही. अपघात झाल्यावर ST fire बसने पेट घेतला. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. सदर परिसरात अग्नितांडव दिसत असल्याने एकच खळबळ उडाली होती. या अपघाताने रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.