युनोकडून नऊ संघटनांना मान्यता

    दिनांक :08-Dec-2022
|
-विशेष सल्लागारांचा दर्जा मिळणार
 
संयुक्त राष्ट्र, 
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने दलित मानवाधिकार संघटनेसह नऊ सामाजिक संघटनांना (एनजीओ) मान्यता दिली. चीन, रशिया, भारतासह अनेक देशांनी यावर आक्षेप घेतला होता, हे विशेष. संबंधित नऊ संघटनांना Special Advisory Status विशेष सल्लागारांचा दर्जा देण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, युनोच्या सहा संलग्न शाखांपैकी आर्थिक आणि सामाजिक परिषद ही एक आहे. परिषदेच्या वतीने आर्थिक व सामाजिक प्रकरणांवर लक्ष देण्यात येते.
 
 
uno
 
Special Advisory Status : इंटरनॅशनल दलित सॉलिडेरिटी नेटवर्क (आयडीएसएन), अरब-युरोपीय कें द्र, बहरिन मानवाधिकार केंद्र, कॉप्टिक सॉलिडेरिटी गल्फ सेंटर फॉर ह्युमन राईट्स, मॅन अ‍ॅण्ड लॉ, अँड्री रिलकोव्ह फाऊंडेशन, द वर्ल्ड युनियन ऑफ कॉसेक अटमॅन्स अ‍ॅण्ड वर्ल्ड विदाऊट जेनोसाईड या संघटनांना मान्यता देण्यासाठी अमेरिकेच्या प्रस्तावावर बुधवारी मतदान करण्यात आले. प्रस्तावाच्या बाजूने 24 आणि विरोधात 17 मते पडली. तसेच, 12 सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, परिषदेच्या 19 सदस्यीय समितीने मागील सप्टेंबरमध्ये संघटनांच्या मान्यता अर्जांना फे टाळून लावले होते.