अखेर ‘त्या’ वाहकाची प्राणज्योत मालवली

एसटीचे स्टेअरींग झाले होते जाम

    दिनांक :08-Dec-2022
|
तभा वृत्तसेवा
नांदगाव पेठ,
बुधवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान ST jamm नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर एसटी बसचा अपघात होऊन बस उड्डाणपूलाच्या कठड्यावर लटकली होती. यामध्ये चालक वाहक गंभीर जखमी होऊन त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र यामधील गंभीर जखमी असलेल्या वाहकाचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
 
ST jamm
 
नागपूर आगाराची औरंगाबाद ST jamm ते नागपूर बस ही अमरावती बसस्थानक येथून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नागपूर जायला निघाली. ही बस सात वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ उड्डाणपुलावर पोहचताच बसचे स्टेअरिंग जाम झाल्याने बसचा अपघात होऊन बस कठड्यावर अडकली. मात्र पुढे बसलेले वाहक गजानन वाकपांजर वय 41 रा. थिलोरी ता. दर्यापूर हे बसमधून थेट खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बस चालक केशव धोटे हे सुद्धा जखमी आहेत.
 
 
32 प्रवासी घेऊन जाणारी ही ST jamm एसटी बस अपघातानंतर उड्डाणपुलावर लटकली होती. यामध्ये काही प्रवासी देखील किरकोळ जखमी आहेत. मात्र मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. ही बस खाली कोसळली असती तर क्षणात होत्याचे नव्हते झाले असते, मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरूप आहेत. मात्र वाहक गजानन वाकपांजर हे खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची पोलिसांनी नोंद घेतली असून दोषी चालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.