बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी उद्धव ठाकरेंची प्राथमिक चौकशी सुरू

    दिनांक :08-Dec-2022
|
- मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती
- जनहित याचिकेवर निर्णय सुरक्षित
 
मुंबई, 
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी आज गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. उद्धव ठाकरेंकडे उत्पन्नांच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करीत या प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जावी, अशी मागणी करणार्‍या जनहित याचिकेवर न्या. धीरज ठाकूर आणि न्या. वाल्मीकि मेनेझेस यांच्या खंडपीठाने या मुद्यावरील निर्णय सुरक्षित ठेवल्यानंतर सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी उपरोक्त माहिती न्यायालयाला दिली.
 
 
Uddhav Thackeray
 
कोणत्याही तथ्यात्मक पायाशिवाय केवळ गृहितकांवर ही याचिका दाखल करण्यात आल्याने ती फेटाळण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. शहरातील रहिवासी गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय आणि ईडीला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सखोल आणि निःपक्षपाती तपास करण्याचा निर्देश जारी करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. खंडपीठाने सकाळच्या सत्रात या प्रकरणाची थोडक्यात सुनावणी घेऊन आदेशासाठी बंद केली. मात्र, दुपारच्या सत्रात पै यांनी या प्रकरणाचा पुन्हा एकदा उल्लेख करून राज्य सरकारची भूमिका न्यायालयाला कळवली. या आरोपांबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांच्यावतीने युक्तिवाद करताना विधिज्ञ अस्पी चिनॉय यांनी या मुद्यावर आक्षेप घेत हा कायद्याच्या प्रकि‘येचा दुरुपयोग असल्याचे सांगितले.