कापूसतळणीत युवकाची हत्या

आरोपी ताब्यात

    दिनांक :08-Dec-2022
|
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
तालुक्यातील रहिमापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या Youth killed कापूसतळणी येथे निकेश सुरेश सगणे याला सोमवारी मारहाण झाली. त्याला अंजनगावसुर्जी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दुसर्‍या दिवशी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
 
Youth killed
 
कापुसतळणी येथील 35 वर्षीय निकेश सगणे सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आपल्या गावातील गांधी चौकातून भाजीपाला घेऊन घरी जात असताना रत्नापूर येथील 30 वर्षीय ललित अंबादास तराळे याने दारू पाजण्याविषयी मागणी केली. तेव्हा निकेश सगणे याने त्यास नकार दिला. तो घरी जात असताना Youth killed ललित तराळे याने शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये त्याच्या गुप्तांगावर गंभीर दुखापत झाल्यामुळे निकेशला गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे पाठवण्यात आले. परंतु येथील रुग्णालयात मंगळवारी 6 डिसेंबरला आणले असता निकेशला मृत घोषित करण्यात आले. त्याचे वडील सुरेश सगणे यांच्या तक्रारीवरून दीपक उर्फ ललित अंबादास तराळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास रहिमापूरचे ठाणेदार सचिन इंगळे करीत आहेत.