एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना जामीन

    दिनांक :08-Dec-2022
|
- दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा
 
नवी दिल्ली, 
नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील कर्मचार्‍यांच्या कथित बेकायदेशीररीत्या phone tapping case फोन टॅपिंग आणि पाळत ठेवण्याशी संबंधित बेकायदेशीर सावकारी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने आज गुरुवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा जामीन मंजूर केला आहे. अर्जाला परवानगी देण्यात येत असून, अर्जदाराचा जामीन मंजूर केला जात आहे, असे न्या. जसमितसिंग यांनी निर्णय देताना सांगितले.
 
 
Delhi High Court
 
भादंवि, भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भ‘ष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सीबीआयने संजय पांडे आणि त्यांची कंपनी आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि.च्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेत अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरोधात बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. आयसेक कंपनीने इतर आरोपींसोबत कट रचून 2009 ते 2017 या कालावधीत एनएसईमधील एमटीएनएल लाईन्स बेकायदेशीरपणे रोखल्या आणि एनएसईच्या अधिकार्‍यांचे कॉल रेकॉर्ड केले, असा आरोप सीबीआयने केला आहे. भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या तरतुदीनुसार आवश्यक असलेल्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता आणि एनएसई कर्मचार्‍यांच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय आयसेकद्वारे phone tapping case  टेलिफोन टॅपिंग केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय पांडे यांना 19 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.