जिहादी हल्ल्यात किमान 12 ठार

    दिनांक :09-Dec-2022
|
बुर्किना फासो,
jihadist attack पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासोमध्ये जिहादी हल्ला झाला आहे. यामध्ये किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक लोक सैन्यदलाला पाठिंबा देणार होते. अशी माहिती एएफपीने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने दिली. जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेला बुर्किना फासो जवळपास सात वर्षांपासून जिहादी हल्ल्यांचा सामना करत आहे. गेल्या महिन्यातही येथे दोन दहशतवादी हल्ले झाले होते. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता.
 
JIHAD
 
सत्तापालटानंतर बुर्किना फासोमधील परिस्थिती बिकट झाली आहे. येथे वारंवार दहशतवादी हल्ले होत आहेत. सध्या येथे लष्कराची राजवट आहे. येथील सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. jihadist attack लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. हल्ला कधी आणि कुठे होईल हे सांगणे कठीण आहे. लाखो लोकांनी भीतीपोटी येथून पलायन केले आहे. गेल्या महिन्यात बुर्किना फासोमध्ये दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले होते. या हल्ल्यांमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये लष्कराच्या आठ जवानांचाही समावेश आहे. 21 नोव्हेंबरच्या पहाटे सशस्त्र दहशतवाद्यांनी एका गावात हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. बुर्किना फासो 2015 पासून जिहादी हल्ल्यांचा सामना करत आहे. यादरम्यान हजारो नागरिक आणि सुरक्षा दलांचे बळी गेले आहेत.