देहींच विदेह होणें।

samrtha ramdas पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात

    दिनांक :09-Dec-2022
|
समर्थ नेतृत्व
माधव  किल्लेदार
 
एका गावात एक संन्यासी आले होते.samrtha ramdas ते संन्यासी गावातील एका मंदिरात जाऊन ध्यान करीत असत.samrtha ramdas गावात भिक्षा मागून अन्न ग्रहण करायचे. गावातील लोकांशी ते फार संवाद साधत नसत. त्यांचा दिवसातील जास्तीत जास्त काळ हा ईश्वर चिंतनात जात असे. काही अल्पावधीतच पंचक्रोशीत त्यांच्याविषयीची माहिती लोकांना मिळायला लागली. लोकं खूप दूरवरून त्यांना भेटायला येत असत. त्यांना अनेक प्रश्न विचारत असत. त्यांच्याकडून प्रश्नांचे निरसन करून घेत असत. ते संन्यासी लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्या गावात एक कुटुंब राहात असे. ते कुटुंब खूप गर्भश्रीमंत होते. त्या कुटुंबातील प्रमुखाचा खूप मोठा व्यवसाय होता. तो कुटुंब प्रमुख वृत्तीने अतिशय सात्विक होता. त्याला त्या संन्याशाविषयी खूप आदर होता.
 
samrath
 
एके दिवशी संन्यासी नदीकाठावर साधना करीत होते. तेवढ्यात तेथे तो सात्विक वृत्ती असलेला व्यक्ती आला. संन्याशाला नमस्कार केला. थोड्या वेळाने संन्याशाने डोळे उघडले. त्याच्या समोर तो व्यक्ती उभा होता. संन्याशाने आशीर्वाद दिला. विचारपूस केली. थोड्या वेळाने त्या मनुष्याने संन्याशाला त्यांच्या घरी येण्यास विनवले. संन्याशानेsamrtha ramdas ‘उद्या येतो' असे सांगितले. त्या मनुष्याने संन्याशाला नमस्कार केला आणि तेथून तो निघून गेला.
 
 
 
संन्याशी आपल्या घरी येणार आहे, याचा आनंद त्या कुटुंबाला झाला. संन्याशी येणार म्हणून त्यांनी घरी वेगवेगळे पदार्थ बनवले. संपूर्ण घराची स्वच्छता करण्यात आली. घरातील सगळे सदस्य संन्याशाचीsamrtha ramdas आतुरतेने वाट पाहात होते. बराच वेळ झाला, पण संन्याशी आले नाहीत. थोड्या वेळाने त्या घरासमोरील एका झाडावर एक कावळा आला. तो कावळा बराच वेळ ‘काव-काव' करीत होता. कावळ्याला घालवून द्यायचा त्या घरातील एका सदस्याने प्रयत्न केला. कावळा झाडावरून उडाला आणि त्याने संन्याशासाठी ठेवलेल्या पंचपक्वांनांच्या ताटावर जाऊन तेथील पदार्थ खाल्ले. त्या कुटुंबाने कावळ्याला तेथून घालवून दिले.
 
 
दुसऱ्या दिवशी पुन्हा तो मनुष्य संन्याशाला भेटला. त्याने संन्याशाला पुन्हा घरी येण्याविषयी प्रार्थना केली. संन्याशी म्हणाला की,
‘‘मी काल आलो होतो.'' त्यावर तो मनुष्य म्हणाला की,
‘‘मला आपण दिसला नाहीत.'' संन्याशी म्हणाला की,
‘‘मी उद्या पुन्हा येईन.''
संन्याशी आपल्या घरी पुन्हा येणार म्हणून घरातील प्रत्येक सदस्याने तयारी केली. पुन्हा नव्याने भिक्षा तयार करण्यात आली. घरातील सदस्य संन्याशाची वाट पाहू लागले. संन्याशीsamrtha ramdas आले नाहीत. थोड्या वेळाने एक घोडा तेथे आला आणि त्याने संन्याशाकरिता बनवलेल्या ताटातील पदार्थ खाल्ले. संन्याशी घरी आले नाहीत म्हणून घरातील सदस्य खूप दुःखी झाले. त्या कुटुंब प्रमुखाने पुन्हा संन्याशाला प्रार्थना केली. संन्याशाने, samrtha ramdas‘मी पुन्हा येईन' असे सांगितले. पुन्हा त्या कुटुंबाने सगळी तयारी केली. संन्याशाची भिक्षा तयार ठेवली. घरातील सदस्य संन्याशाची वाट पाहात होते. तेवढ्यात एक निष्कांचन व्यक्ती तेथे आली. त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला. कुटुंबातील सदस्यांनी त्या निष्कांचन व्यक्तीला फटकारले. त्या व्यक्तीने संन्याशाकरिता बनवलेले ताट पळवून नेले आणि ते अन्न खाल्ले. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबातील सदस्य त्रस्त झाले. त्यांचा त्या संन्याशावरील विश्वास उडाला. पुन्हा संन्याशाला घरी बोलवायचे नाही, असे त्यांनी ठरवले. परंतु, तो कुटुंब प्रमुख मात्र अजूनही संन्याशाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून होता. त्याने पुन्हा संन्याशाला घरी येण्याची प्रार्थना केली.
 
 
दुसऱ्या दिवशी मात्र संन्याशी त्या कुटुंब प्रमुखाच्या घरी आला. संन्याशाला अचानक आपल्या घरी पाहून कुटुंबातील सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्यांनी संन्याशाला नमस्कार केला. संन्याशानेsamrtha ramdas त्यांना आशीर्वाद दिला. त्या कुटुंबातील भिक्षा ग्रहण केली. त्या घरात ते संन्याशी ध्यानस्थ बसले. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. त्यांच्यासमोर कुटुंबातील सदस्य बसले होते. ते कुटुंब प्रमुख हात जोडून बसले होते. त्यांनी संन्याशाला विचारले की,
‘‘आपण इतक्या दिवसांनी अचानक घरी कसे आलात?'' त्यावर ते संन्याशीsamrtha ramdas म्हणाले की,
‘‘मी तीन वेळा तुमच्या घरी येऊन गेलो. परंतु, तुम्ही ओळखले नाही.'' कुटुंब प्रामुखाने विचारले की, ‘‘तीन वेळा! आपण कधी आलात?'' त्यावर ते संन्याशी म्हणाले की,
‘‘पहिल्यांदा कावळ्यांच्या रूपात आलो. तेव्हा तुम्ही मला उडवून दिले. दुसऱ्यांदा घोड्याच्या रूपात आलो तेव्हा मला घालवून दिले. तिसऱ्यांदा एका निष्कांचन व्यक्तीच्या रूपात आलो तेव्हा मला फटकारले.'' संन्याशाचे बोलणे ऐकल्यावर कुटुंब प्रमुखाला त्यांच्या कृत्याबद्दल दुःख झाले. त्याने संन्याशाची क्षमा मागितली. संन्यासीsamrtha ramdas पुढे म्हणाले की, ‘‘या तिन्ही वेळेस तुम्ही मला माझ्या मूळ स्वरूपात पाहिले नाही. त्यामुळेच आज मला यावे लागले. मी संन्यासी आहे अशीच माझी ओळख तुम्हाला आहे. परंतु, या सर्व प्राणिमात्रात असलेला जीवात्मा एकच आहे, याची ओळख तुम्हाला नसल्याने तुम्ही मला ओळखू शकले नाहीत.'' त्या संपूर्ण कुटुंबाला उपदेश करून संन्याशाने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते तेथून निघून गेले.
 
 
पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव प्राण्याने देह धारण केला आहे. पण, आपल्या सगळ्यांचा जीवात्मा मात्र एकच आहे. याची जाणीव आपल्याला नसल्याने देहबुद्धीचा विसर मनुष्य प्राण्यासहित इतरांनाही होत नाही. त्यामुळेच देह धारण केलेल्या जीवांना एकरूप होता येत नाही. यातूनच मनुष्यप्राण्याला स्वत्वाची ओळख होत नाही. मानवप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राणी हे देहबुद्धीचा विसर पडण्यास असक्षम असतात. मनुष्याला मन, बुद्धी आणि प्रज्ञा प्राप्त झाल्याने तो देहबुद्ध ते आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास करू शकतो. मनुष्यप्राण्याला ईश्वरानेsamrtha ramdas स्वत्वाची ओळख करून देण्याची संधी दिलेली आहे. परंतु, मनुष्यप्राणी हा देहबुद्धीच्या मोहात पडल्यानेच तो आत्मबुद्धीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ही संधी तो वाया घालवतो. जीव आणि शिव हे दोन आत्मे आहेत. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा शिवस्वरूप होण्यासच येत असतो. जीवात्मा हा क्षणाक्षणाला शिवात्म्याकडे जात असतो. शिवात्मा हा जीवात्म्याला एकदाच येऊन भेटतो. ज्या जीवास शिवस्वरूप व्हायचे असेल त्याने जीवाची सेवा करावी. यालाच स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘जीव भावे शिवसेवा।'
 
 
ज्यांना समर्थsamrtha ramdas नेतृत्व करायचे असते त्यांनासुद्धा ‘मी देह आहे' याचा विसर पडणे अत्यावश्यक आहे. मानवी इतिहास ज्यांना देहबुद्धीचा विसर पडला त्यांनीच समर्थ नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडूनच सर्वोत्तम दर्जाचे संघटन निर्माण झाले आहे. त्यांनीच मानवी समाजाला संजीवनी दिली आहे. आजतागायत मानवी समाजात जे जे सृजनात्मक कार्य झाले आहे, होते आहे किंवा होणार आहे ते या समर्थ नेतृत्वामुळेच शक्य झाले आहे. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांनी वानर सैन्याचे नेतृत्व केले. प्रभू श्रीरामाने स्वतःच्या देहबुद्धीचा विसर पाडून वानर सैन्याला घेऊन रावणाचा पराभव केला. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांची देहबुद्धीचा विसर पाडला आणि महाभारत युद्धात विजय मिळवून दिला. आचार्य चाणक्याने राजा धनानंदाचा पराभव करण्यासाठीच चंद्रगुप्त मोर्यासारखा शिष्य घडवला ते देहबुद्धीचा विसर पडल्यानेच! आधुनिक भारतात स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वतःच्या देहबुद्धीचा विसर पडल्यानेच ते समस्त हिंदू समाजाचे समर्थ नेतृत्व करू शकले; ज्यामुळे भविष्यातील जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न भारताचे सत्यात उतरेल.
 
देहबुद्धीचा विसर पडण्यासाठी श्रीसमर्थ श्रीमद् दासबोधात असे म्हणतात की,
‘तेंचि काया मी आपण हें देहबुद्धिचें लक्षण।
येणेंकरिता जालें प्रमाण दृश्य आवघें।
इकडे सत्य मानीला देहों तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो।
दोहींमध्यें माहा संदेहों। पैसावला बळें।
देहबुद्धी केली बळकट। आणि ब्रह्म पाहों गेला धीट।
तो दृश्यानें रुधिली वाट परब्रह्माची।
तेथें साच मानी दृश्याला निश्चयची बाणोनि गेला।
पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात।।'०६/०८/४१/४४।।
याचा अर्थ असा आहे की, देह मीच आहे अशी भावना म्हणजेच देहबुद्धी. अविद्यामय देह मीच आहे ही भावना ठेवल्याने दृश्य पाहिले की, ते सर्वस्वी खरेच वाटते. देहाला सत्य मानले, दृश्याला सत्य मानले, मायेच्या बळाने दोन्हीकडे भरपूर संशय भरून ठेवला आहे. देहबुद्धी बळकट करून ब्रह्मवस्तू पाहण्याचा प्रयत्न केला की, परब्रह्मापर्यंतची वाट दृश्य जगताने अडवली आहे असे दिसते. आत्मज्ञानाच्या क्षेत्रात जे दृश्य आहे तेच सत्य आहे, हेच आपण खरे मानतो आणि या भ्रमामुळे अकस्मात केवढा मोठा घोटाळा झाला आहे. मी पणाची देहबुद्धी आहे तोपर्यंत ब्रह्मप्राप्ती होणे शक्य नाही.
 
 
श्री समर्थsamrtha ramdas असे म्हणतात की,
‘देहींच विदेह होणें करून काहींच नं करणें।
जीवन्मुक्तांची लक्षणें जीवन्मुक्त जाणें।।'०६/०९/३३।।
याचा अर्थ असा आहे की, देहांत राहूनही देह नसल्यासारखी वृत्ती सांभाळणे ही जीवन्मुक्तांची लक्षणे जीवन्मुक्तच जाणतात.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मनुष्याला देहबुद्धीचा विसर पडावा म्हणून म्हणतात की, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग कारण जोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत संघर्ष अटळ आहे. म्हणून जेव्हा देहबुद्धीवर विजय मिळेल तेव्हाच आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन समर्थ नेतृत्व करता येईल.
।।जय जय रघुवीर समर्थ।।