विद्यार्थ्यांचे चांगभले करणारा स्तुत्य उपक्रम!

    दिनांक :10-Feb-2022
|
अग्रलेख
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक Academic क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान जसे शिक्षकांवर, Teacher शैक्षणिक Academic संस्थांवर आणि शिक्षण विभागांवर आहे तसेच ते सरकार, प्रशासन आणि सामाजिक संस्थांवरही आहे. हे नुकसान जेवढे लवकर भरून काढले जाईल, तेवढ्या लवकर शैक्षणिक Academic नुकसानीमुळे हतबल झालेली पिढी ताळ्यावर येईल. शैक्षणिक Academic क्षेत्रात हे आव्हान कसे पेलायचे यावर खल सुरू आहे. मंथन केले जात आहे आणि त्याबाबत निरनिराळ्या मंचांवर चर्चादेखील सुरू आहे.
 
Education-scaled
 
काहींनी त्यावर सरकारच्या सूचनांची अथवा आदेशांची वाट न बघता आपापल्या परीने विद्यार्थ्यांची ज्ञानोपासना पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर अभ्यासक्रम भरून काढण्याचे आव्हान पेलायचे असेल तर शनिवार-रविवारी शाळा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे उलटली; पण अजून म्हणावे तसे कुठलेच काम या सरकारच्या नावाने नोंदलेले नाही. सर्वच आघाड्यांवर माघारलेल्या या सरकारच्या एका वरिष्ठ नेत्याने शनिवार-रविवार शाळा सुरू ठेवण्याचे केलेले वक्तव्य मात्र अभिनंदनीयच म्हणावे लागेल. शैक्षणिक Academic क्षेत्राने त्यांच्या सूचनेचे योग्यरीत्या पालन केले आणि मनावर घेऊन तशी वागणूक ठेवली तर निश्चितच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम काही अंशी पूर्णत्वास जाईल, यात शंकाच नाही.
 
 
दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर शाळा-महाविद्यालये बंदच आहेत. आताशी पालकांनी काही अटींवर मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. दुस-या लाटेनंतर शाळा सुरू होण्याची स्थिती आली असतानाच तिस-या लाटेची चाहुल लागल्यानं पुन्हा शाळा-महाविद्यालये Academic बंद करावी लागली होती. आता तिस-या लाटेचा जोरही ओसरताना दिसत आहे. इतर क्षेत्रे जशी खुली झाली तसेच निर्णय शैक्षणिक Academic क्षेत्राच्या बाबतीत शिथिल करताना प्रशासनातर्फे घेतले गेले आहेत.
 
कोरोनामुळे झालेले शैक्षणिक Academic नुकसान भरून काढण्यासाठी आभासी शिक्षणाचा पैलू पुढे आला होता. पण त्यातून विद्यार्थ्यांचा कितपत फायदा झाला, हे आजही कोडेच आहे. आभासी शिक्षण फारसे प्रभावी ठरले नाही, असा निष्कर्ष काढला गेला आहे. यातून विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे लक्ष आहे की नाही, हे कळायलाच मार्ग नाही. विद्यार्थ्यांचे हावभाव दिसत नसल्याने शिकविलेले विद्यार्थ्यांच्या पचनी पडते किंवा नाही, हे कळायलाही मार्ग नाही. शिवाय आभासी शिक्षण घेण्यासाठी लागणा-या साधनांचा अभाव दिसून आला. कुणाकडे मोबाईल नव्हते तर कुणाकडे इंटरनेटची सुविधा नव्हती. अनेक ठिकाणी तर इंटरनेट असूनही कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती. काही ठिकाणी संगणकांवर काम भागविले गेले, पण तेथेही अनेकदा विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात ताळमेळ नव्हता.
 
या कालावधीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दुरावाही वाढला. शिक्षकांच्या रागावण्याचा काही एक परिणाम विद्यार्थ्यांवर झाल्याचे दिसले नाही. शिक्षक ओरडून ओरडून थकले तरी विद्यार्थी नुसती मोबाईलची लिंक सुरू करून वर्गात नावापुरतेच जॉईन झालेले दिसले. इकडे शिकवून शिक्षकांचा घसा कोरडा पडला; मात्र दुस-या बाजूने विद्यार्थ्यांच्या थंड प्रतिसादाने शिक्षकही वैतागले. रात्र रात्र जागून विषय तयार करण्यात, नव तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना सामोरे जाण्यातच शिक्षकांची ऊर्जा वाया गेली. मोबाईल कनेक्टिव्हिटीची, इंटरनेटची समस्या शिक्षकांनाही होतीच. कुठे पेपर काढण्यात त्यांची शक्ती खर्च झाली तर कुठे पेपर तपासताना त्यांची त्रेधा उडाली. पेपर आभासी असल्याने विद्यार्थ्यांनी कॉपी केली की नाही, हे कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे मूल्यांकनात हुशार विद्यार्थी मागे आणि मागच्या रांगेतील कॉपीबाज विद्यार्थी पुढे, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
मुख्य म्हणजे विद्यार्थी अभ्यासक्रमात माघारले. त्यांना ना धड इंग्रजीचे धडे मिळाले ना धड मराठीचे! गणिताचा वाघोबा आधीच विद्यार्थ्यांना घाबरवतो. त्याने तर पार गत करून टाकली. शिक्षकांशी वन टू वन संवाद करू शकण्यास विद्यार्थी असमर्थ असल्याने अनेकांची गोची झाली. आधीच कठीण पातळीवर असलेल्या विषयांची काठिण्य पातळी अधिकच वाढली. वर्षभरात कौशल्यातही विद्यार्थी कमी पडले. आदानप्रदान कमी झाल्याने विद्यार्थ्यांमधील शेअरिंगची वृत्ती कमी झाल्याचे या काळात केलेल्या एका अभ्यासात दिसून आले. घरच्या घरी अभ्यास केल्याने मुले अनेक गोष्टी विसरून गेल्याचा अनुभव शिक्षकांना आला. त्यांच्यातील अभ्यासाच्या क्षमतेत जशी घट झाली तशीच एखादा विषय जाणून घेण्याच्या क्षमतेतही घट झाली. अनेकांना तर लिहायला, वाचायलाच येत नसल्याचे ध्यानात आले. काहींची लिखाणाची सवय मंदावली. हीच बाब ध्यानात घेऊन बोर्डाने अंतिम परीक्षेतील लेखी परीक्षेचा कालावधी तीनऐवजी साडेतीन तास करण्याचा निर्णय घेतला.
 
माघारलेला अभ्यासक्रम भरून काढायचा असेल तर शिक्षकांना जास्तीचे काम करावेच लागणार आहे. निश्चित कोरोना काळात काही शाळांनी शिक्षकांची Academic पगार कपात केली तर कुठे शिक्षकांनाच नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे शिक्षकांच्या रोजीरोटीसोबतच त्यांच्या अस्तित्वाचेही प्रश्न निर्माण झाले. विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे, असे आपण मानत आलो आहोत आणि तोच जर कोरोनामुळे उद्भवलेल्या पृष्ठभूमीवर माघारला असेल, तर त्याला अभ्यासात कुशल बनविण्याचे काम शिक्षकांनाच करायला हवे आहे. अशात शिक्षकांकडून कारणे सांगितली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
पण महामारी काही दरवर्षी येणारी नाही. अशी संकटे ३०-४० वर्षांनंतर उद्भवतात. त्याला तोंड देण्यासाठी म्हणूनच शिक्षकांना आपल्या जीवनातील काही तास, काही दिवस अथवा काही आठवडे देण्याची गरज आहे. लोखंड जास्त तापवले की शुद्ध होते; तसेच शिक्षकांनीही स्वत:ला शैक्षणिक Academic त्यागाच्या यज्ञात आपल्या वेळेची आहुती दिली तर विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उजळले जाईल. गेल्या दोन वर्षांत नाही म्हणायला शिक्षकांना बराच आराम मिळालेला आहे. त्या आरामाची पूर्तता करण्याचे दिवस आता आले आहेत. त्यामुळे या काळात ढेपाळून न जाता आपला विद्यार्थी अभ्यासात कसा समोर जाईल, याची काळजी शिक्षकांनीच घ्यायला हवी.
 
मुख्याध्यापकांनी लादल्यानंतर शिक्षकांना तसे करावेच लागणार आहे. पण असे करताना त्यांनी आनंदाने हे काम स्वीकारून विद्यार्थ्यांच्या माघारण्यास ब्रेक लावायला हवा. नागपुरातील काही शाळांच्या Academic शिक्षकांना आपला विद्यार्थी माघारतोय, हे लक्षात येताच त्यांनी मुखाच्छादन, भौतिक दूरता आणि विषाणूनाशकाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या घरी भेटी दिल्या. त्यांना धीर देत त्यांच्या अभ्यासातील अडचणीदेखील दूर केल्या. काही शिक्षकांनी सार्वजनिक ठिकाणी मोजक्याच विद्यार्थ्यांना एकत्र करून, त्यांना नव्या विषयांचा उलगडा करून दिला. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानात प्रवीण करण्यासाठी पावले उचलली. आपला विद्यार्थी काळाच्या मागे पडू नये म्हणून खरोखरीच शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून आपले योगदानही दिले.
 
तंत्रज्ञानाशी मुकाबला करताना शिक्षकांनाही अनेकदा झुंज द्यावी लागली. आभासी शब्दच त्यांच्यातील अनेकांनी प्रथम ऐकला होता. त्यामुळे आपले मोबाईल काळाच्या कसोटीवर टिकण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून त्यांची झालेली दमछाक अनेकांना टिपता आली. शाळा Academic नव्याने सुरू होताच विद्यार्थ्यांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत केले गेले. पूर्वीचे शिक्षकांबद्दलचे भय या स्वागत समारोहाने पार दूर करून टाकले. एवढे दिवस शिक्षकांपासून अंतर बाळगून असलेले विद्यार्थी शाळेतील Academic स्वागताने पुरते भारावले. आपले शिक्षक केवळ रागावतातच, केवळ मारतातच किंवा केवळ गृहपाठाबद्दलच विचारतात म्हणून कायम शिक्षकांपासून फटकून राहणारी मुले, शाळा प्रवेशाच्या दिवशी शिक्षकांनी केलेल्या स्वागतामुळे त्यांच्या हृदयाजवळ आली. आता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील बॉन्डिंग पुढेही तसेच कायम ठेवण्याची गरज आहे. यातून शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांचेही चांगभले होणार आहे.