या हिजाबचा हिसाब वेगळा!

    दिनांक :13-Feb-2022
|
प्रहार
दिलीप धारूरकर
 
सध्या हिजाबवरून hijab एक वाद कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झाला आहे. हा वाद आता देशभर पोहोचला आहे. हिजाबवरून hijab आता नेहमीचीच झुंडशाही उठून उभी राहिली आहे. ‘आम्ही झुंडीने आहोत त्यामुळे आता आमचंच चालणार. देशाचा कायदा, संस्थेचे नियम याच्याशी आमचं काही देणघेणं नाही‘ असा या झुंडीचा आग्रह आहे. ढोंगी धर्मनिरपेक्षतेला लागलेलं हे कटू फळ आहे. ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे ढोंग करणारे लबाड लोक आता मात्र सोईस्करपणे मूग गिळून गप्प आहेत. ते लांबून मजा पाहण्यात जास्त सोय समजतात. हा देश वारंवार अशा झुंडीच्या लहरीवर चालणार की कायदे, कानून यावर ठाम राहणार ? झुंडशाहीच्या विरोधात समाज उभा राहणार आहे की नाही ? हे खरे प्रश्न या हिजाबवरून उभे राहिले आहेत.

hijab girl
 
हिजाब hijab म्हणजे घरातील पडदा. हिजाबवरून वाद सुरू झाला तेव्हा टीव्हीच्या वृत्तवाहिन्यात एका चर्चेत आलेल्या अमीना शेरवानी नावाच्या मुस्लिम विदुषीने थेट मौलाना यांना सवाल केला की, ‘कुराणात किंवा कोणत्याही धार्मिक मुस्लिम पुस्तकात हिजाबचा उल्लेख कुठे आहे सांगा? मौलाना निरुत्तर होते. प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा विषयांतर करून निसटू पहात होते. याचा अर्थ जो तर्क दिला जात आहे की ‘हिजाब ही एक पंथीय उपासनेची गोष्ट आहे. त्यामुळे संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या उपासनेची गोष्ट पाळण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यानुसार हिजाबला कोणी रोखू शकत नाही.
 
 
हिजाबवर बंदी घालता येणार नाही. ‘ या सर्व युक्तिवादातील पायाच ठिसूळ होऊन जातो. हिजाबला इस्लाममधील कसलाही आधार नाही. हिजाब म्हणजे चेहरा आणि हात झाकणारा काळा कपड्याचा पडदा. बुरख्याचा एक छोटा आविष्कार. मात्र हिजाब आणि बुरखा सारखाच समजून या वादात तसे दर्शविण्यात येत आहे. हा वाद सुरू झाला तो कर्नाटकातील किनारपट्टीतील मंगळूर जिल्ह्यातील उडुपी येथे. तेथे अभाविपच्या एका निदर्शनात तीन मुस्लिम युवती आघाडीवर सहभागी झाल्या होत्या. ते पाहून काही मुस्लिम धुरिणांचे पोट दुखू लागले. त्यांनी या मुलींच्या घरी जाऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग केले. त्या महाविद्यालयात सीएफआय या कट्टररपंथी मुस्लिम युवक संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यात अगदी नियोजन करून एक कट रचण्यात आला असे म्हणण्यास मोठा वाव आहे.
 
कारण जेथून हा हिजाबचा hijab वाद सुरू झाला त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत नीट पाहिले तर काही प्रश्न पडतात. त्यामध्ये एक मुस्लिम विद्यार्थिनी बुरखा घालून गाडी पार्क करते. तिला विरोध होताच ती घोषणा द्यायला सुरुवात करते. ‘अल्ला हो अकबर‘च्या तिच्या घोषणांना भगवे उपरणेधारक विद्यार्थी ‘जय श्रीराम'ने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करतात. ही ‘मुलगी अल्ला हो अकबर'च्या घोषणा हात उंचावत देत अगदी बिनधास्त तिथून निघून जाते. जी माहिती पुढे आली आहे ती अशी आहे की या महाविद्यालयातील सीएफआयच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब म्हणत बुरखा घालून महाविद्यालयात यायला सुरुवात केली.
 
महाविद्यालयाने गणवेश घालून येण्यास त्यांना सांगितले. तो आदेश झुगारून देत ‘आपला धार्मिक अधिकार आहे आम्ही बुरखा घालूनच येणार' असे म्हणत या हटकून बुरखा  घालून येऊ लागल्या. मुलांनी मग ‘भगवे रूमाल घालून यायला परवानगी द्या' अशी मागणी सुरू केली. त्यावर ठरवून त्या दिवशी बुरखा घालून येत त्या मुलीने घोषणा देत तेथे सगळे नाट्य केले. पूर्वनियोजित असल्याने या प्रसंगाचे छान चित्रीकरण करून ते व्हायरल करण्यात आले. ‘इस्लाम खतरे में' पडायला मग किती तो वेळ लागणार? मालेगावात एक हजारावर मुस्लिम महिलांनी बुरखा hijab घालून मेळावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसने बुरखाधारी महिलांचा मोर्चा काढला. हे लोण निवडणूक असलेल्या प्रांतात तसेच देशभर पसरले. हा सर्व नियोजन करून केलेला धिंगाणा आहे.
मुळात जर सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहा असे सांंगितले. कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील निकाल येईपर्यंत सर्व शिक्षणसंस्थांमध्ये धार्मिक पोषाख घालून जाऊ नये, असा अंतरिम आदेश दिला. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेससारख्या जबाबदार पक्षाने बुरखाधारी hijab महिलांचा मोर्चा काढावा हा न्यायालयाचा अवमानच म्हटला पाहिजे. लांगूलचालनाची इतकी घाई की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निकाल येईपर्यंत थांबण्याची देखील यांची तयारी नाही. इस्लामचे एक अभ्यासक तारेक फतेह यांनीही एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना कुराणमध्ये हिजाबबाबत hijab उल्लेख नसल्याच्या अमीना शेरवानी यांच्या दाव्याला पुष्टी करणारी माहिती दिली आहे
‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो' अशी जी उक्ती आहे तिचा अनुभव १९८५ पासून वारंवार येतो आहे. शहाबानो प्रकरणात जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पोटगीचा हक्क मान्य केला तेव्हा त्या विरोधात गावागावात ‘शरियत बचाओ'चे मोर्चे काढले गेले. आज जेव्हा हिजाबला hijab धार्मिक आधार नाही हे लक्षात आले तेव्हापासून सगळ्या चर्चेत मुस्लिम नेते, मौलवी संविधानातील समानता, मूलभूत अधिकारांचा हवाला देत चढ्या आवाजात बोलत आहेत. ही मंडळी शहाबानो प्रकरणाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि संविधान झुगारून झुंडशाहीने विरोध करीत होती. देशात स्वराज्य मिळाल्यानंतर सर्वाधिक बहुमत असलेले राजीव गांधींचे काँग्रेसचे सरकार या झुंडशाहीसमोर झुकले.
 
घटनादुरुस्ती करण्यात आली. या झुंडशाहीच्या दबावापुढे झुकून पोटगीचा अधिकार मुस्लिम महिलांना नाकारून त्यांना मध्ययुगात लोटण्याचे पाप या लांगूलचालनाच्या, गठ्ठामतांच्या राजकारणाने केले. राजीव गांधी आणि त्यांचे सरकार यांनी केलेली ही चूक अजून देशाच्या मानगुटीवर बसलेली आहे. तसे तर हे लांगूलचालन खिलाफत चळवळीसारख्या प्रतिगामी चळवळींला पाठिबा देण्यापासून काँग्रेसने सुरू केले. त्याचा भयंकर परिणाम फाळणीच्या रूपाने देशाने अनुभवला. इतिहासातून काही न शिकता राजीव गांधींनी शहाबाने प्रकरणात झुंडशाहीपुढे झुकत कायदा बदलला. तेथून ‘आम्ही म्हणतो म्हणून ...' नावाची ही झुंडशाही सुरू झाली आहे.
 
अगदी अलीकडे शाहीनबाग प्रकरणात असाच प्रयोग होता. झुंडशाहीच्या बळावर सीएए मागे घ्यायला लावण्याचा प्रयोग होता. त्याला काँग्रेस आणि दिल्लीतील अन्य पक्षांचा छुपा पाठिंबा होता. आम आदमी पक्षाचे अनेक नेते सक्रिय सहभाग घेत होते. केवळ दिल्लीतील रस्ता अडवायचा नव्हता तर मोदींचा रस्ता अडवायचा असा डाव होता. रस्ता अडवण्याचा हाच प्रयोग पुढे शेतकरी आंदोलनाच्या नावाने झाला. अगदी पंजाबमध्ये मोदी प्रचाराला गेले असताना त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयोगही करण्यात आला. या सर्व प्रकारांना काँग्रेसचा छुपा पाठिंबा होता. लोकशाही मार्गाने भाजपचा पराभव करू शकत नाही तर आडमार्गाने भाजप आणि मोदी यांना अडविण्याचा हा प्रकार काँग्रेसने सुरू केला आहे. या प्रकारात अराष्ट्रीय प्रवृत्ती, संकुचित शक्ती, धोकादायक प्रकार यांना उत्तेजन देण्याचा आगीचा खेळ आपण खेळतो आहोत याचे काँग्रेसला भान नाही. कसलेच भान ठेवण्याइतपत समज काँग्रेसच्या नव्या नेतृत्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
आता हिजाबच्या hijab नावाने तोच अडवणुकीचा आडमुठा प्रकार सुरू करण्यात आला आहे. हिजाबला hijab कुराणात मान्यता आहे काय? संविधानातील कोणत्या तत्त्वात सार्वजनिक नियम झुगारून हिजाबचे hijab घोडे दामटणे चालते? असले प्रश्न विचारायचे नाहीत. ‘आम्ही अल्पसंख्यक आहोत आणि आम्ही झुंडशाही करू शकतो. रस्ते अडवू शकतो. गोंधळ घालू शकतो. जगभर बदनामी करू शकतो त्यामुळे आमचे ऐका. नव्हे ऐकलेच पाहिजे. नव्हे कसे ऐकत नाहीत तेच आम्ही पाहतो,' असाच या लोकांचा आविर्भाव आहे.
होय, घटनेने आपल्या पसंतीप्रमाणे उपासनेचे किंवा उपासना न करण्याचेही स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे. अगदी मूलभूत अधिकाराप्रमाणे हे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र ते वैयक्तिक आहे. आपल्या घरात तुम्ही कोणतीही उपासना कोणत्याही पद्धतीने करा याचा अधिकार आहे याचा अर्थ सार्वजनिक नियम झुगारून ते करण्याचा अधिकार नाही. सिग्नलच्या चौकात अगदी प्रचंड ट्राफिकच्या वेळी मध्यभागी ‘आम्ही आमची प्रार्थना म्हणणार. आम्हाला घटनेने उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे' असे तुम्ही म्हणाल तर ते कसे चालेल? विमानाने प्रवास करायचा आहे तर विमानतळावरील नियम, सुरक्षा तपासणी, विमानातील नियम पाळावेच लागतील. आमचे उपासनेचे स्वातंत्र्य आहे म्हणून या नियमात सवलत कशी मिळेल? तसेच महाविद्यालयात जर शिक्षण घ्यायचे असेल तर शिक्षण संस्थेने जे नियम ठरविले आहेत त्याचे पालन करावेच लागेल. गणवेश झुगारून देत आम्ही हिजाबच hijab घालणार असे म्हटले तर कसे चालेल? मग महाविद्यालयात जाणे सोडा आणि हिजाब hijab घालून घरी बसा. विमानाने प्रवास तर नियम मोडून करता येत नाही. तिथे प्रवेश नाकारला जातो. चौकात जर अडथळे आणले तर पोलिस हाताला धरून बाजूला करतात. फारच आडमुठेपणा केला तर बिनभाड्याच्या घरात पाठवितात.
या झुंडशाहीला कणखर प्रशासनाचा अनुभव नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार देत आहे. तरीही वारंवार गोंधळ घालून आपलेच म्हणणे पुढे करीत झुंडीची ताकद, आवाज आणि वेडेपण वाढवत नेण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. सीएएविरोधात उत्तरप्रदेशात जेव्हा दंगली करण्याचा प्रयत्न झाला. जाळपोळ करण्यात आली. तोडफोड केली. तेव्हा त्यात जे नुकसान झाले त्याची भरपाई दंगल करणा-यांकडून करण्यात आली. त्यांचे फोटोेसह फलक शहरात लावण्यात आले. योगी आदित्यनाथ यांच्या या धडाक्याने या झुंडशाहीला तेथे चांगलीच धडकी भरली आहे.
‘अडाण्याचा आला घोडा वाटेतल्या वेशी मोडा...' अशी एक म्हण आहे. आता अडाण्याचा घोडा आला तर वेशी मोडल्या जाणार नाहीत हे जरा कणखरपणे सांगितले गेले पाहिजे. सज्जन शक्ती, राष्ट्रीय शक्ती संघटित सामर्थ्याने उभी राहणे आणि त्याचे प्रकटीकरण लोकशाही मार्गाने करणे हेच या झुंडशाहीवरचे चोख उत्तर आहे. उत्तरप्रदेशातील मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मतपेटीतून अशा संघटित सामर्थ्याचे दर्शन घडविले. भाजपला ४०३ पैकी ३२५ जागा मिळाल्या. नेहमी अल्पसंख्यक मतांचा गठ्ठा पाहून लाळ गाळत चाटूगिरी करणा-या पक्षांमध्ये या निवडणुकीत अयोध्येपासून प्रचार सुरू करण्याची स्पर्धा लागली होती. सावरकरांनी भाकीत केल्याप्रमाणे कोटावरून जानवी घालून जनेऊधारी हिंदू बनण्याचे नाटक करावे वाटू लागले. हाच चमत्कार आहे. हिजाबचा hijab हिसाब जर चुकता करायचा असेल तर संघर्ष, घोषणाबाजी न करता मतपेटीतून संघटित सज्जन आणि राष्ट्रीय विचारांचा आविष्कार घडवावा लागेल. सुतासारखे सरळ होऊन सर्वच मंडळी संविधान महत्त्वाचे, देशहित सर्वात मोठे असे मंत्र म्हणू लागतील. एकूण जागरणाची दिशा पाहता तो दिवसही फार दूर नाही!