गरज मध्ययुगीन विचारांच्या पलीकडे जाण्याची !

    दिनांक :13-Feb-2022
|
आसमंत
हितेश शंकर
 
फरखंदा नावाच्या तरुणीची गोष्ट आपल्याला आठवते का? अफगाणिस्तानातील या २७ वर्षीय हिजाब hijab घातलेल्या तरुणीवर १९ मार्च २०१५ रोजी काबुल येथे हल्ला करण्यात आला होता. मुल्लांनी भडकविल्याने तिच्यावर हा हल्ला झाला होता. हल्लेखोरांच्या प्रचंड जमावाने चारही बाजूंनी घेरून तिला ठार मारले. फरखंदावर कुराण जाळल्याचा आरोप करण्यात आला होता. एका महिलेवर आरोप करून, तिला चारही बाजूंनी घेरून ठार मारण्याच्या या मानसिकतेला आपण काय म्हणाल? तथापि, तिने कुराण जाळले असेल किंवा नसेलही; पण तरीही तुम्ही तिच्या हत्येचे समर्थन करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या हत्येसाठी हे कारण ठरू शकत नाही. वापरले जाऊ शकत नाही आणि मुख्य म्हणजे ते आरोपही खोटे ठरले.

hijabgirl
 
धर्माच्या नावाखाली प्रतिबंध आणि कायदा हातात घेण्याचा खेळ केवळ काबुल-कराचीपुरताच मर्यादित आहे काय? अर्थातच नाही.काही वर्षांपूर्वी काश्मीरमधील राजौरी येथे जान बेगम या ४३ वर्षीय महिलेची मुस्लिम कट्टरवाद्यांनी हिजाब hijab न घातल्यामुळे हत्या केली होती. हिजाब hijab लादणे आणि स्त्रियांचे हक्क उघडपणे डावलल्यानंतरही धर्मनिरपेक्ष, पुरोगामी किंवा स्त्रीवादी विचारंवंतांनी तोंडातून ‘ब्र' देखील काढला नव्हता.
 
आज ज्या मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हिजाबचा वाद कर्नाटकातील उडुपी येथून सुरू केला आहे, त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही नेते आणि समाज पुढे सरसावले आहेत. राजौरी, अफगाणिस्तानात महिलांची हत्या तसेच त्यांचा आत्मसन्मान, हक्क व मानवाधिकार पायदळी तुडविल्यानंतरही ज्यांनी तालिबानी अत्याचारांवर कधी तोंड उघडले नाही, तेच आज बुरख्याचे समर्थन करणा-या तालिबानी विचारसरणीला पाठिंबा देत आहेत.
तसे, एखाद्या सुसंस्कृत समाजात कायद्याला दूर सारून विशिष्ट वर्गाकडून बंधने घातली, तर ती कितपत घातली जातील. भारतातही हिजाबचे पाठीराखे व धर्मांधतेचे पुरस्कर्ते पाहता या विषयावर चर्चा आवश्यक ठरते. पहिली गोष्ट म्हणजे हिजाब hijab लागू करून मुल्ला-मौलवींना काय साध्य करायचे आहे? जे लोक स्त्रीकडे केवळ हपापलेल्या नजरेने पाहतात ते लोक तिला आणखी किती पिंज-यात, अंधारकोठडीत ठेवू इच्छितात? आणि दुसरे म्हणजे, या धर्मांधांना पाठीशी घालणारे, त्यांची तरफदारी करणारे लोक कोण आहेत? पुरोगामी, धर्मनिरपेक्ष!
महिलांचे शरीर पाहून पुरुष उत्तेजित होतील म्हणून स्वत: सुधारण्याऐवजी त्यांना वस्त्रात लपेटले पाहिजे, ही विचारसरणी सुसंस्कृत, निरोगी, सुदृढ समाजाची विचारसरणी असू शकते काय? या गोष्टींवर जेव्हा वाद होतात तेव्हा पुरोगामी मंडळी नेहमीच मूलतत्त्ववाद्यांना, कट्टरवाद्यांना साथ देतात, असे दिसून येते. हिंदुस्थानला अफगाणिस्तान बनविणा-या तालिबानी विचारसरणीच्या समर्थकांना पाठिंबा देणा-या, त्यांची वकिली करणा-यांना धर्मनिरपेक्ष किंवा पुरोगामी कसे म्हणायचे? वास्तविक हा निव्वळ दुटप्पीपणा आहे, विषारी विचार आहे आणि जो फक्त विषवमनच करतो.
आठवा. इराणमध्ये हिजाब घालणे अनिवार्य असल्याने २०१६ मध्ये नेमबाज हिना सिद्धू आणि २०१८ मध्ये बुद्धिबळपटू सौम्या स्वामीनाथन यांनी स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यावेळी भारतातील पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि स्त्रीवादी कुठे होते? समाज माध्यमांवर या महिला खेळाडूंना जिहादी कट्टरवाद्यांकडून प्रचंड शिवीगाळ करण्यात आली. तेव्हा एकाही स्त्रीवाद्याने आपले तोंड उघडले नव्हते.
वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक नियम महत्त्वाचे
सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याची, ओळख लपविण्याची सूट दिली जाऊ शकत नाही. हे एक विचारशील जग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरते तेव्हा सामाजिक नियम वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरतात. त्या आधारावरच समाजाचे व्यवहार चालतात. लक्षात घ्या की, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मुखाच्छादन घालता, मास्कने चेहरा झाकता. पण जेव्हा तुम्ही विमानतळावर प्रमाणीकरणाच्या (व्हेरिफिकेशन) रांगेत उभे असता, मग तेव्हा हिजाब hijab असो, मुखवटा असो किंवा मुखाच्छादन असो तुम्हाला ते बाजूला करावे लागते. जेव्हा एखादी व्यवस्था समाजाशी निगडित असते तेव्हा तुम्ही असे म्हणू शकत नाही की, ही आमची वैयक्तिक बाब असल्याने ती आम्ही स्वीकारणार नाही. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लायटर सोबत घेऊन जायचे असेल तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता; परंतु विमानात लायटर नेऊ शकत नाही. कारण त्यामुळे इतरांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, इतर यंत्रणांसाठी ते धोक्याचे ठरू शकते. विमानात मोबाईल नेल्यास एरोप्लेन मोडवर ठेवण्यास सांगितले जाते. कारण मोबाईल अन्य यंत्रणांमध्ये अडथळा आणतो.
 
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा समान पोशाख सर्वांच्या सामान्यीकरणाची सामाजिक शिस्त आहे. ही कोणत्याही एकाच्या विशिष्टीकरणाची विसंगती टाळते. जर तुम्ही अशा व्यवस्थेला बाधा आणत असाल तर तुमच्यावर सुयोग्य, वाजवी बंधने घालणे हा समाजाचा अधिकार आहे. वाजवी निर्बंध म्हणजेच स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य आणि मनमानी यात हाच फरक आहे.
त्याचप्रमाणे जेव्हा हिजाबविषयी चर्चा सुरू असते तेव्हा एका बाजूला हिजाब hijab असतो आणि दुसरीकडे नग्नता असते. जर मधली रेषा काढायची असेल, तर तुम्हाला मोकळेपणा आणि सन्मान यात स्पष्टपणे फरक करावा लागेल. कुठल्याही गोष्टीला बेलगाम होण्याची सूट सामाजिक व्यवस्थेत दिली जाऊ शकत नाही. एकीकडे कुणावर पडदे टाकायला गेलात तर दुस-या बाजूला कुणीतरी नग्नावस्थेत उतरतो. या दोन्ही गोष्टी सामाजिक नियमनात अडथळा निर्माण करतात आणि अशावेळी ही व्यक्तिगत स्वातंत्र्याची बाब आहे, असे म्हणणे हे चुकीचे आहे. ही लिंगसंबंधित (जेंडर) बाब नाही; जिला महिलांच्या स्वातंत्र्याचा अधिकार म्हणून संबोधित करता येईल. जे पुरुष महिलांकडे हपापलेल्या, वाईट नजरेने पाहतात, त्यांनी सोयीस्करपणे बुरख्याला तर्काच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुषांनी आपल्या दृष्टिकोनात, विचारात सुधारणा करण्याऐवजी त्याची जबाबदारी स्त्रियांवर टाकण्यात आली आहे.
हिंसक प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे आहे
हे जग या वादाकडे ज्या पद्धतीने पाहत आहे, त्या विषयी विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, पाश्चिमात्य देशात हिंसक निदर्शनांची संख्या आपल्यापेक्षा कमी आहे. पण जेव्हा बुरख्यावर बंदी घालण्याचा मुद्दा आला तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये गेल्या वर्षी मार्चमध्ये यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने होतात आणि त्यावेळी चेहरा झाकलेला असतो, त्यामुळेच चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली. भारतात दगडफेक करणा-यांनी आपले चेहरे झाकले असल्याचे आपण पाहिलेले आहे. केरळ आणि काश्मीरमध्येही हे पाहिले आहे. तेथे लिंग हा मुद्दाच नाही. त्यामुळे एकीकडे आपल्या पाशवी मानसिकतेच्या आधारे महिलांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे हिंसक प्रवृत्ती आणि कट्टरतावादाला वेसण घालण्यासाठीदेखील नकाब, बुरखा hijab यांचा वापर थांबवायला हवा.
बुरख्याची गैर-धार्मिक प्रथा
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात भारताच्या असरा क्यू. नोमानी आणि इजिप्तच्या हाला अरफा यांनी हिजाब hijab आणि बुरखा hijab इस्लामशी कसा जोडला गेला हे सांगितले आहे. वास्तविक त्यात काहीही धार्मिक नाही. मुस्लिम महिलांसाठी हिजाब किंवा बुरखा अनिवार्य नव्हता. आधुनिक मुस्लिम समाजावर वर्चस्व गाजवण्याचा हा सनातनी मुस्लिमांचा वित्तपोषित प्रयत्न आहे, असे या दोघींनी आपल्या लेखात स्पष्टपणे नमूद केले आहे. बुरख्याचे प्रस्थ कसे वाढले हे देखील नोमानी आणि अरफा या दोघींनी लिहिले आहे. पहिले कारण म्हणजे १९७९ मधील इराणी शिया आंदोलन आणि दुसरे म्हणजे सौदी अरबमधील धनाढ्य सुन्नी मुल्लांचा वाढता प्रभाव. या दोन गोष्टींमुळे हिजाब, बुरख्याचे hijab प्रस्थ माजले. त्यामुळेच गल्ली-मोहल्ल्यात वावरताना मुली आणि स्त्रियांना डोके झाकून ठेवण्यास सांगण्यात येऊ लागले, चरित्रहीन, असभ्य स्त्रिया डोके झाकत नाहीत असे सांगण्यात येऊ लागले. अशा प्रकारे महिलांवर दबाव आणण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे या दोघींनी आपल्या लेखात म्हटले आहे.
त्यानंतर बांगलादेशी-अमेरिकन महिला नजमा खान आणि शिया टीव्ही केंद्र अहलुल बाईत यांनी २०१३ मध्ये जागतिक हिजाब hijab दिन सुरू केला. नजमा खान या ब्रुकलिन स्थित हिजाब hijab कंपनीच्या मालकीण आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांना कॅलगरी विद्यापीठाने पाठिंबा दिला. वाईट नजरांपासून महिलांना वाचवण्यासाठी हिजाब आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर, virtualmosqu e.com आणि al-islam.org नावाच्या अतिजहाल संकेतस्थळांनी हिजाब न घालणा-या महिलांची थट्टा करणारे लेख प्रकाशित करण्यास सुरुवात केली.
तथापि, ‘मुस्लिम महिलांना केस झाकण्याची गरज नाही' असे सातव्या शतकापासूनच्या तसेच आधुनिक काळातील मोरोक्कोेच्या फातिमा मरनिसीपासून यूसीएलएच्या खालिद अबु अल-अदल आणि हार्वर्डची लैला अहमद, इजिप्तचे जकी बदवई, इराकचे अब्दुल्ला अल-जुदाई आणि पाकिस्तानचे जावेद घामिदी यांच्यासारख्या मुस्लिम विद्वानांनी स्पष्टपणे सिद्ध केले आहे.
हेडस्कार्फ आणि बुरखा समानार्थी शब्द नाहीत
एक अतिशय मनोरंजक गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात ज्या गोष्टीला कट्टरवादी हेडस्कार्फ म्हणत आहेत, हिजाब hijab आणि बुरखा यात फरक असल्याचे सांगत आहेत; वास्तविक असे काही नाही. ‘बॅरियर' अथवा प्रतिबंध असाच बुरखा शब्दाचा अर्थ आहे. अरबी भाषेत बुरख्याचा अर्थ डोक्यावरचा स्कार्फ असा होतच नाही. अरबी भाषेत हिजाब शब्दाचा अर्थ बुरखा असाच होतो. काहीतरी लपवणे, अडथळा आणणे, कुणाला अथवा कुठल्या तरी गोष्टीला वेगळे करणे असा याचा अर्थ होतो. शब्दांचे कितीही खेळ केले तरी हिजाब किंवा बुरखा हा स्कार्फ असल्याचे सिद्ध करता येत नाही. दुसरे म्हणजे, या गोष्टी मुस्लिम महिलांच्या धार्मिक चिन्हांशी संबंधित आहेत असा कुराण किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथात कुठेही उल्लेख नाही. ही कट्टरतावादी विचारसरणी आहे. धर्मांधतेची विचारसरणी आहे. समाजात फूट पाडणारी विचारसरणी आहे आणि स्त्रियांची मुस्कटदाबी करणारी विचारसरणी आहे. काही स्त्रिया या कट्टरवाद्यांच्या प्रभावाखाली आलेल्या दिसतात. त्यामुळे त्या हिजाबचा hijab पुरस्कार करताना दिसतात. खरे तर त्यांचे घर, कुटुंब आणि समाजात असा दबाव निर्माण करण्यात आला आहे.
 
किंबहुना आपण जेव्हा समस्त मुस्लिम समाजाला तो मागासलेपण, गरीब, निरक्षर याचे मुख्य कारण म्हणजे या समाजाचे नेते मध्ययुगीन विचारांचे आहेत. मध्ययुगीन विचारसरणीतून बाहेर पडल्याशिवाय ना सामाजिक विकास होऊ शकतो, ना मुस्लिम समाजाचा विकास, ना मुस्लिम समाजांतर्गत महिलांचा विकास. त्यामुळे जेथे समानतेची वागणूक दिली जात नाही आणि भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना समान मानले जात नाही अशा शैक्षणिक संस्थांना वठणीवर आणण्याची गरज आहे. अशी कार्यवाही करणे ही काळाची गरज आहे. आणि आता सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे न्यायालयाचा. उडुपीचे हिजाब hijab प्रकरण तापल्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने हे प्रकरण ज्या प्रकारे मोठ्या खंडपीठात वर्ग केले त्यावरून काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा साध्या सामाजिक मुद्यांवरही काही जणांना उद्धटपणे शाळेची शिस्त मोडावीशी वाटते, अशा प्रश्नांवर थेट, स्पष्ट व रोखठोक निर्णयही वेगाने देता येत नाही का? प्रकरण तापवणा-या लोकांची गर्दी पाहून उच्च न्यायालयातील खंडपीठाचा विस्तार केल्याने न्यायिक दृढतेविषयी अनावश्यक सामाजिक चर्चा घडून येऊ शकतात. महिलांना मध्ययुगीन साखळीत बांधणारे हा कट्टरवादी मुद्दा काबुल, राजौरी येथून आता थेट कर्नाटकात पोहोचला आहे. त्यामुळेच सामाजिक एकता आणि न्यायालयाची दृढता नव्या भारताची गरज आहे.
अनेक देशांमध्ये हिजाब-बुरख्यावर बंदी
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हिजाबबाबतचा हा वाद आधुनिक जगासाठी काही नवीन नाही. आधुनिक जगाने बुरख्याला नाकारले आहे. २००४ मध्ये फ्रान्सने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बुरख्यावर बंदी घातली होती. २०११ पासून, देशभरात सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चेहरा झाकणारे कपडे, उपकरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. २०११ मध्ये बेल्जियम, २०१२ मध्ये रशिया, २०१८ मध्ये डेन्मार्क, २०१६ मध्ये ऑस्ट्रिया, २०१७ मध्ये बल्गेरियाने सार्वजनिक ठिकाणी बुरखा hijab आणि चेहरा झाकणा-या अन्य वस्त्रांचा वापर करण्यावर बंदी घातली. नेदरलँड्सने १४ वर्षांच्या चर्चेनंतर बुरख्यावर बंदी घालणारा कायदा लागू केला. एवढेच नव्हे, तर सीरियामध्येही २०१० पासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे तसेच इटलीमध्येदेखील बंदी आहे.