डिस्को किंगची एक्झिट !

disco king बप्पी लाहिरी ट्रेंड सेटर होते

    दिनांक :20-Feb-2022
|
आसमंत 
- उषा उत्थुप
 
मी बप्पीदांसोबत disco king bappi lahiri भरपूर काम केलं. माझ्यासोबत काम करताना ते खूप आनंदी असायचे. मागील ३० वर्षांच्या काळात बप्पीदांशिवाय disco king bappi lahiri माझा एकही कार्यक्रम झाला नाही. ‘हरी ओम हरी' hari om hari सादर केल्याशिवाय माझा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. ‘वन, टू चा चा चा', ‘कोई यहां नाचे, नाचे', ‘नाका बंदी', ‘लॉकेट', ‘मैं आ गई, सुपरस्टार...' अशी एकापेक्षा एक लोकप्रिय गाणी आम्ही केली. या गाण्यांशिवाय माझा कार्यक्रम अपूर्ण राहतो.
 
 
asm
 
त्यांनी disco king माझ्यासोबत केलेलं प्रत्येक गाणं यशस्वी ठरलं, खूप गाजलं. म्हणूनच माझ्यासोबत काम करायला ते नेहमीच खूप उत्सुक असायचे. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर आमची जोडी सर्वोत्तम होती. आम्ही "जोडी नंबर वन" होतो. माझ्यासोबत हरी ‘ओम हरी,' ‘रांबा हो' आणि ‘कोई यहां नाचे नाचे'सारखी सुपरहिट गाणी केल्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटायचा. ३८ ते ४० वर्षांच्या गायन कारकीर्दीत जवळपास प्रत्येक वर्षी बप्पीदांसोबत disco king bappi lahiri माझं एक तरी गाणं असायचं. कोरोना corona काळात मी सादर केलेल्या आभासी कार्यक्रमांमध्येही बप्पीदांची disco king bappi lahiri गाणी अग्रस्थानी असायची. बप्पीदा खऱ्या अर्थाने भारताचे डिस्को किंग disco king होते. त्यांनी आपल्या संगीताच्या माध्यमातून डिस्को disco हा प्रकार भारतात प्रचलित केला. बप्पीदांनी disco king सुमधूर गाणी दिली. ‘चलते चलते,' ‘माना हो तुम बेहद हसीं' ही त्यांची गाणी मैलाचा दगड ठरली. त्यांनी हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात बरंच काम करून ठेवलं आहे. त्यांचं संगीत क्षेत्रातलं योगदान कधीही विसरता येणारं नाही. बप्पीदांनी disco king bappi lahiri मोठ्या नायकांसाठी गाणी केली. त्यांच्या संगीताने सजलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तरी त्यातली गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि यातच बप्पीदांचं disco king मोठेपण सामावलं आहे.
 
 
 
 
बप्पीदा प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी उडत्या चालीच्या गाण्यांसोबतच सुमधूर गाणीही दिली. बप्पीदांनी disco king bappi lahiri ‘रांबा हो'च्या वेळी पहिल्यांदा सिंथ ड्रम्सचा Synth drums वापर केला होता. गाणं सुरू होण्याआधी या ड्रम्सचा एक वेगळाच आवाज कानी पडतो. बप्पीदांनी केलेला हा प्रयोग तुफान गाजला. हा अनोखा आवाज प्रत्येकाला आवडला. त्यानंतरच्या काळात प्रत्येक दिग्दर्शकाला, गायकाला आणि नायकाला आपल्या गाण्यांमध्ये हा आवाज असावा, असं मनापासून वाटायचं आणि अशा आवाजाची मागणी केली जायची. या गाण्याच्या वेळी त्यांनी रिपिट मशीनही वापरलं होतं. म्हणजे प्रत्यक्षात मी ‘रांबा हो' एवढंच म्हटलं होतं. त्यानंतरचे ‘हो हो हो' हे शब्द या मशीनमधून बाहेर पडायचे. ‘रिपिट मशीन' हा प्रकार पहिल्यांदा बप्पीदांनीच disco king bappi lahiri हिंदी चित्रपट संगीतात आणला. त्यांच्या या कल्पकतेचं खूप कौतुक झालं. बप्पीदा अशा पद्धतीचे नवनवे प्रयोग करायला कधीही कचरले नाहीत. मला ‘रांबा हो'च्या रेकॉर्डिंगचे दिवस अगदी लख्ख आठवतात. त्यावेळी आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये Mehbub Studio होतो.
हे देखील ऐका ... 
 
 
त्यावेळी ‘सिरिल' नावाचा बप्पीदांचा disco king bappi lahiri एक सहकारी हे रिपिट मशीन हाताळायचा. सगळं काही व्यवस्थित जुळून येईपर्यंत बप्पीदांनी अनेकदा ‘रांबा हो'चं रेकॉर्डिंग केलं. ‘रांबा हो'च्या यशानंतर प्रत्येकालाच अशा पद्धतीने गाणं करावंसं वाटू लागलं. रिपिट मशीनचा वापर करावासा वाटू लागला. त्यामुळे बप्पीदा हे चित्रपटसृष्टीतले ‘ट्रेंड सेटर' होते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बप्पीदा अत्यंत हसतमुख आणि साधे होते. त्यांनी मला नेहमीच मोकळेपणाने गाऊ दिलं. ‘उषाजी, तुम्ही तुमच्या पद्धतीने गाणं म्हणा' असं ते मला नेहमी म्हणायचे. बप्पीदांचं disco kingbappi lahiri संगीतावर खूप प्रेम होतं. गाणं आतून अनुभवायचं आणि मग गायचं, असं त्यांचं म्हणणं असायचं. गाणं आधी आत्म्यापर्यंत पोहचू द्यायचं आणि मग सादर करायचं. अशा पद्धतीने समरसून गाणं म्हटलं की लोकप्रिय होणारच, असं ते म्हणायचे. त्यांचे हे शब्द माझ्या मनावर अक्षरश: कोरले गेले. बप्पीदा disco king bappi lahiri थोर संगीतकार होते. मात्र, दुर्दैवाने त्यांना फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही.
 
बप्पीदा disco king म्हणजे गुणवत्तेची खाण होते. त्यांना अजून बरंच काही मिळायला हवं होतं. बप्पीदांच्या क्षमतेचा पूर्ण वापर झालाच नाही. त्यांना फक्त डिस्को गाण्यांपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं. ही बाब मला नेहमीच खटकत आली आहे. बप्पीदा नेहमीच सोन्याने मढलेले असायचे. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता. यावरून काही वेळा त्यांची खिल्लीही उडवली जायची. पण बप्पीदांनी disco king bappi lahiri या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. ते मनस्वी आयुष्य जगले. बप्पीदांना रॉकस्टार Rockstar व्हायचं होतं. आपलं हे स्वप्न त्यांनी पूर्णही केलं. बप्पीदा आयुष्यभर रॉकस्टारप्रमाणे वावरले. बप्पीदांसोबतच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत. मी गळ्यात फक्त एक मंगळसूत्र घालून का वावरते, असा प्रश्न अनेक जण विचारतात. त्यावर बप्पीदांनी disco king bappi lahiri मला अनेक सुंदर गाणी करायची संधी दिल्यामुळे सगळं सोनं मी त्यांना देऊन टाकलं, असं मी गमतीने म्हणायचे! बप्पीदांना हा विनोद खूप आवडायचा आणि ते खळखळून हसायचे.
 
 
हे देखील ऐका ...  
 
हिंदी चित्रपटसृष्टीने Bollywood त्यांना पुरतं ओळखलं नाही, याची मला कायम खंत राहील. एवढी सुरेल गाणी देऊनही हिंदीतल्या संगीतकारांमध्ये बप्पीदांचं स्थान दुय्यमच राहिलं. खरं तर असं व्हायला नको होतं. बप्पीदांसारखा disco king bappi lahiri एवढा प्रतिभावान संगीतकार काहीसा उपेक्षितच राहिला, याचं खरंच खूप वाईट वाटतं. बप्पीदांनी गाण्यांची नक्कल केली, असंही म्हटलं गेलं. प्रत्यक्षात नक्कल हा शब्द मला चुकीचा वाटतो. त्याऐवजी एखाद्या गाण्यातून किंवा संगीतातून प्रेरणा घेऊन रचना साकारली, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरतं. आज अनेक संगीतकारांनी अशा पद्धतीने अन्य रचनांमधून प्रेरणा घेतल्याचं दिसून येतं. ‘हरी ओम हरी' आणि ‘वन वे तिकीट' या दोन गाण्यांमध्ये साम्य असलं, तरी आज ‘वन वे तिकीट' विस्मृतीत गेलं आहे आणि ‘हरी ओम हरी' आजही लोकप्रिय असून श्रोत्यांकडून नेहमीच या गाण्याची मागणी होत असते, हे विसरून चालणार नाही.
 
बप्पीदांची disco king bappi lahiri गाणी सदाबहार आहेत आणि हीच त्यांच्या संगीताची जादू आहे. हाच बप्पीदांचा करिश्मा आहे. कोणत्याही संगीताची किंवा गाण्यांची कधीही तुलना होऊ नये, असं मला वाटतं. कारण शेवटी गाणं हे गाणं असतं. बोनी एम, अब्बा तसंच अन्य आंतरराष्ट्रीय कलाकारांनी संगीत सादर केलं आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी त्यांच्या पद्धतीचं संगीत सादर केलं. आज जगभरात या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. बप्पीदांबाबतही असंच म्हणता येईल. बप्पीदांनी संगीत तयार केलं आणि ते जगभरात पोहोचलं. संगीताच्या माध्यमातून बप्पीदा bappi lahiri जगभरातल्या चाहत्यांशी जोडले गेले. त्यांच्या रचना कालातीत आहेत, यात अजिबात शंका नाही. बप्पीदांशी माझं साधारण सहा महिन्यांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं. त्यांनीच मला फोन केला होता. ‘तू सध्या घराबाहेर पडतेस का?' असं त्यांनी मला विचारलं होतं. त्यावर गेलं दीड वर्षं मी कुठेही गेले नसून फारशी घराबाहेर पडत नसल्याचंही मी सांगितलं होतं. त्यावेळी तुमच्यासाठी दोन-तीन गाणी असल्याचंही ते मला म्हणाले होते.
 
ही गाणी मला म्हणायची आहेत, दुस-या कोणालाही ती देऊ नका, असं मी त्यांना म्हणाले होते. त्यांनीही मग ही गाणी फक्त तुमच्यासाठी असल्याचं आणि तुमच्यासाठी थांबणार असल्याचं मला सांगितलं होतं. आपली जोडी सर्वोत्तम आहे. त्यामुळे आपण ही गाणी करू या, असं ते मला म्हणाले होते. पण दुर्दैवाने ही गाणी होऊ शकली नाहीत. खरं तर बप्पीदा disco king bappi lahiri होते असं म्हणणं, त्यांचा उल्लेख भूतकाळात करणं हे माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे. बप्पीदांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहे. ते आपल्यातून खूप लवकर निघून गेले. बप्पीदा या जगात नाहीत, यावर विश्वास ठेवणं खरंच खूप अवघड आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. बप्पीदा शरीराने आपल्याला सोडून गेले असले, तरी त्यांचं संगीत अमर आहे. गाण्यांच्या माध्यमातून ते आपल्यात राहणार आहेत. त्यांचा आवाज कायम आपल्या कानांमध्ये घुमत राहणार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना!