तिसऱ्या आघाडीचा बुडबुडा!

    दिनांक :22-Feb-2022
|
अग्रलेख
देशात परिवर्तन घडविण्याची गरज असून काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला छेद देण्यासाठी मजबूत strong भारत बनविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकतेच मुंबईत केले. देशात परिवर्तन करायचे म्हणजे काय करायचे, वातावरण कोण बिघडवत आहे, याचे नेमके उत्तर त्यांनी दिले नसले, तरी त्यांचा रोख केंद्रातील मोदी सरकारवर असावा, यात संशय नाही. भारत मजबूत strong करण्याची आवश्यकता असल्याच्या त्यांच्या तिसऱ्या प्रतिपादनाशी त्यांचे समर्थकच नाही तर देशातील समस्त विरोधकही सहमत होतील. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे भारत मजबूत strong करण्याच्या कामाला सुरुवात करावी, या कामात देशातील जनताही त्यांच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही.

pawar-&-rao.jpg
 
गेल्या साडेसात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मजबूत strong करण्याचेच काम करीत असल्यामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तसेही देश मजबूत strong करण्याचे काम कोणा एकट्याने करण्याचे काम नाही; देशातील सर्वांचा त्यात सहभाग असला पाहिजे. चंद्रशेखर राव यांच्यासारख्या नेत्याला देश मजबूत strong करावा असे वाटत असेल तर त्यांचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे. चंद्रशेखर रावच नाही तर अगदी काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्याही मनात देश मजबूत strong करण्याची भावना येत असेल तर पक्षीय राजकारणाच्या बाहेर येत त्यांनाही पाठिंबा दिला पाहिजे. मात्र, देश मजबूत strong करण्याची कोणाचीही भावना प्रामाणिक असली पाहिजे. दिखाऊपणाची नसावी. देश मजबूत strong करण्याच्या आडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्थिर करण्याचा, त्यांना हटवण्याचा प्रयत्न कोणी खपवून घेणार नाही. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी तो यशस्वी होणार नाही, ही दगडावरची रेघ आहे.
 
 
गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशात तिसरी strong आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोघेही मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात आणि या दोघांनाही आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहायला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. त्यांनी रात्री नाही तर दिवसाही स्वप्न पाहावी. देशभरातील मोदीविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न आधी एकदा ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला. आता चंद्रशेखर राव करून पाहात आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचाही यात सहभाग आहे.
 
चंद्रशेखर राव यांनी आपल्या जाळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओढण्याचा प्रयत्न केला आहे. तो सध्या यशस्वी झाल्यासारखा दिसतो. शिवसेनेने दक्षिण भारतातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यासमोर मैत्रीचा हात पुढे करावा, हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूड म्हटला पाहिजे. मुंबईतील दक्षिण भारतीय लोकांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठीच आणि मराठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनेने एकेकाळी दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध जोरदार आंदोलन उभे केले होते. दक्षिण भारतीय अण्णांविरुद्धच्या या आंदोलनातील शिवसेनेचा ‘उठाव लुंगी बजाव पुंगी' हा नारा तेव्हा खूप गाजला होता. आज त्याच दक्षिण भारतातील राजकीय नेत्याचे स्वागत करण्यासाठी पायघड्या पसरण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. शिवसेनेच्या अधोगतीचेच हे लक्षण म्हटले पाहिजे.
 
पंतप्रधान मोदी हे ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे या तिघांचे समान शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी चंद्रशेखर राव मुंबईत आले. या दोघांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाआघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने या तीन महानुभावांनी यावेळी चर्चा केली असावी. पण आमची राजकारणावर चर्चा झाली नाही; बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, अशी मखलाशी पवार यांनी केली.
 
मुळात तिसरी आघाडी उभी करण्यात गैर आणि बेकायदेशीर असे काही नाही. हो, आम्ही तिसरी आघाडी उभी करण्याबाबत चर्चा केली, असे पवार यांनी छातीठोकपणे सांगायला हरकत नाही. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे कारण नाही. याआधी देशात अनेक वेळा तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रत्येक वेळी फसला. कारण या तिसऱ्या आघाडीची स्थापना कोणत्याही नीतिमूल्याशिवाय करण्यात येत होती. मुळात तिसरी आघाडी ही देशातील सत्ताकांक्षी विविध राजकीय आणि त्यातही प्रादेशिक पक्षांचे कडबोळे आहे. यातील प्रत्येकच पक्षाच्या महत्त्वाकांक्षी नेत्यांची नजर पंतप्रधानपदावर आहे. त्यामुळे एकदा आघाडीची स्थापना झाली की, प्रत्येक पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याचे पाय ओढायला लागतो. त्यामुळे यावेळी तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली रे झाली की, यापेक्षा वेगळे काही होणार आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्रिपद, देशाचे संरक्षणमंत्रिपद आणि कृषिमंत्रिपद भूषविलेल्या शरद पवारांचे लक्ष पुन्हा एकदा पंतप्रधानाकडे लागले आहे. याआधी त्यांना अनेकदा पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली आहे. यावेळीही यापेक्षा वेगळे काही होणार नाही.
 
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवत असला, तरी त्याची ताकद एखाद्या प्रादेशिक पक्षांपेक्षाही कमी आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष असो, चंद्रशेखर राव यांचा तेलंगणा राष्ट्र समिती असो की स्टॅलिन यांचा द्रमुक पक्ष असो; या तिन्ही नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता मिळविली आहे, म्हणजे आपापल्या राज्यात त्यांची थोडीफार ताकद आहे. ममता बॅनर्जी यांनी तर सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये बहुमत मिळविले. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात आतापर्यंत एकदाही स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता विदर्भ आणि मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नाही. काँग्रेसचा पदर धरल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे राजकारण करता येत नाही तर असे पवार मोदींविरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी अधूनमधून प्रयत्न करतात.
 
कधीकाळी देशाच्या राजकारणात भाजपा आणि काँग्रेस हे दोन प्रमुख घटक होते. आज देशात भाजपाची ताकद strong जबरदस्त वाढली आहे. गेल्या साडेसात वर्षांपासून देशात भाजपाची सत्ता आणि जवळपास दोनतृतीयांश राज्यात भाजपाची सत्ता आहे. उलट केंद्रातील सत्तेपासून तर काँग्रेस कधीचीच दूर झाली आहे; नजीकच्या काळात येण्याची शक्यताही नाही तसेच देशातील फक्त दोन-तीन राज्यातच काँग्रेसची सत्ता उरली आहे. काँग्रेसला आणि त्याच्या नेत्यांनाही आज देशात कोणी मोजत नाही. त्यामुळे काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण यातून साध्य काही होत नाही. कारण तिसरी आघाडी हा काही स्थिर आणि सक्षम पर्याय होऊ शकत नाही.
 
मोदींविरोधात देशातील सर्व राजकीय पक्षांनी तिसरीच नाही तर चौथी, पाचवी, सहावी अशा कितीही आघाड्या उभ्या केल्या, तरी फार फरक पडत नाही. कारण या सर्व पक्षांचे मोदी हटावचे राजकारण हे सत्ता मिळविण्यासाठी आहे तर मोदींचे राजकारण हे जनतेच्या व्यापक कल्याणासाठीचे आहे. देशातील शेवटच्या माणसाचे कल्याण हा मोदींच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या मार्गाने मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे. आधी देश, मग पक्ष आणि सर्वात शेवटी मी या भूमिकेवर मोदी सरकारची आणि भाजपाचीही वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मोदींच्या मागे प्रचंड असा जनाधार आहे. पंतप्रधान म्हणून मोदींना लाभलेली लोकप्रियता ही आतापर्यंतच्या एकाही पंतप्रधानांच्या वाट्याला आली नाही. लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोदींनी कधीच मोडले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आघाड्या निर्माण केल्याचा प्रयत्न केला तरी मोदींच्या स्थानाला धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही.
 
लोकप्रियतेचे अढळपद मोदींनी आपल्या कष्टाने मिळविले आहे. त्यामुळे ते स्वत:ला पंतप्रधान नाही तर प्रधानसेवक म्हणवतात. फकीर म्हणून स्वत:चा उल्लेख करतात. मोदींची बरोबरी करू शकेल, असा देशाच्या राजकीय क्षितिजावर एकही नेता आधीही नव्हता, आजही नाही आणि उद्याही दिसणार नाही. त्यामुळे चंद्रशेखर राव असो, ममता बॅनर्जी असो, स्टॅलिन असो की उद्धव ठाकरे असो; मोदींचे काही बिघडवू शकत नाही. राहुल गांधी तर या दिग्गज नेत्यांच्या पासंगालाही पुरत नाही. त्यामुळे या नेत्यांनी मोदींविरोधात कितीही आदळआपट केली तरी मोदींचे काही बिघडणार नाही; उलट मोदींची ताकद वाढणार आहे, यात शंका नाही.