‘अवचिता परिमळू...!'

    दिनांक :24-Feb-2022
|
ऊन सावली
गिरीश प्रभुणे
अगदी जवळ शेजारी असून आळंदीत माउलींच्या Mauli दर्शनाला जाणं शक्य असूनही होत नाही. एक-दोनदा गेलो, तर दर्शनच घेऊ दिलं नाही. माउलींचं Mauli दर्शन घेता घेता वाहिलेली फुलं-हार कुणीतरी हातांनी समाधीवर न वाहता क्षणीच सर्रकन दूर केले. डोळे भरून पाहता पाहताच कुणीतरी कर्कश्श्य ओरडलं... आणि ढकलून बाहेर आलो... डोळे आसवांनी भरून आले. माउलींच्या Mauli कुशीत शिरून विसावायच्याच क्षणी दुरावा... जड मनाने प्रदक्षिणा करून मंडपात एका खांबाला विसावलो. दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी... त्यात माउलींच्या Mauli आई आणि वडील सामावून गेले... देहांत प्रायश्चित्त स्वीकारून.... संन्याशाची मुलं पोरकी झाली... कसा गेला असेल तो दिवस... पायाला चटके बसत असताना... पोटात अन्नाचा कण नसताना... रोखलेली बोटे... विखारी नजरा...
 
sant-dnyaneshwar.jpg
 
जे खळांची व्यंकटी सांडो
सत्कर्मे रती वाढो...
भुतां परस्परे जडो।
मैत्र जीवांचे...।।
असे मोगऱ्याचे ताटवे फुलले मनात... मन विशाल विश्वात्मक बनले...!
विश्वांचे आर्त...
माझ्या मनी प्रकाशले....
आळंदीला... इंद्रायणीला डोळ्यात साठवून मी वाटेने चालत आलो... ज्या आभाळाखालच्या वाटेने माउली Mauli चालले... किती गर्दी... किती दुकानं... किती निर्माल्य... इंद्रायणीच अंधूक झाली...
 
 
ढोल... झांजा... आरतीच्या गजरात माउलींचा Mauli एकांत कुठं हरवून गेला...
एक दिवस अचानक मित्र सतीश गोरडे म्हणाले, चला जाऊ... डॉ. आल्हादांच्या घरी. आल्हादांचं घर म्हणजे वाडीच. मोठ्या जागेत सात भावंडांचे सात बंगले, आई-वडिलांसह राहणारे आगळं वेगळं एकत्र कुटुंब, एकमेकांत मिसळलेल्या डेरेदार वृक्षाच्या फांद्या. प्रत्येक फांदी वेगळ्या दिशेनं वाढणारी. तरी सर्वांची छाया एक. भूमी एक मन एक, तिथं प्रवचन होतं. सर्वजण ज्ञानेश्वर माउलींचे Mauli भक्त. वारकरी, सारंच अद्भुत, कुठलाच डामडौल नाही. कर्कश्श गाणी नाहीत. शांत... संयमी... आदराची लगबग! हरिभक्त परायण डॉ. नारायण महाराज जाधव यांचं ज्ञानेश्वरीवर प्रवचन. एक तास कसा गेला समजलंच नाही. भक्तिरसाच्या ज्ञानसागरात आकंठ न्हाऊन निघालो. पांढरे स्वच्छ धोतर, अंगरखा, एक उपरणं, टोपी, स्नेहपूर्ण वागणं-बोलणं, आया-बाया-पुरुष सारेच शांतपणे त्यांच्या पायावर डोकं टेकवत होते. नको नको... हवं हवं... काही नाही... साधं सरळ अनाग्रही सारं माउली Mauli चरणी लीन...! आणि माउलींचं दर्शन दृश्य पदोपदी होऊ लागलं. या सर्व परिसरात माउलींचाच वास आहे, असं जाणवू लागलं. पुन्हा काही दिवसांनी सतीश गोरडे आले. ‘‘चला काका,.. आळंदीला जाऊ...''
 
नारायण महाराजांच्या आश्रमात मोठा मांडव घातलेला. व्यासपीठावर डॉ. नारायण महाराज बसलेले. नारायण महाराजांच्या या महोत्सवात ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी, पारायणासाठी; हजारो तरुण आळंदीत दाखल झाले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे युवक गेले काही दिवस ज्ञानेश्वरी- गाथा- भागवत समजून घेत भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत आहेत. यांच्या गावातून हे सर्व स्वखर्चाने आलेत. पांढरा पायजामा-धोतर-पांढरा अंगरखा- टोपी, उपरणं. ज्ञानेश्वरीची पारायण प्रत अत्यंत श्रद्धेने अनुसरत होते. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर एक नि:शब्द क्रांती बहुजन समाजात घडताना दिसत होती. पुढची पिढी एक नवा इतिहास रचत होती. वारकरी संप्रदायाच्या मार्गावरून चालणारी ही नवी युवा पिढी अनेक प्रकारचा त्याग सहजगत्या करून इथं प्रवचनांचा अभ्यास करीत होती. ना भ्रमणध्वनी, ना बातम्या, ना आहारात कोणतेही अभक्ष भक्षण नाही. एका कठोर व्रताचा अंगीकार करीत ज्ञानाचे दीप आजच्या मायारूपी घनघोर अंधारात तेवताना दिसत होते...!
दरवर्षी असा स्वाध्याय यज्ञ होत असतो. यासाठी शेतकरी-लोक धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, गूळ, तेल, तिखट सारं सामान स्वखर्चाने पोहोच करतात; सारंच जीवनभराचं कार्य समजून.
फोडिले भांडार
धन्याचा हा माल
उदास विचारे वेच करि...!
 
इंद्रायणीच्या प्रवाहाप्रमाणे निरंतर चालणारा हा भारतप्रवाह.... स्वयंप्रकाशी स्वयंप्रज्ञ... दिन प्रतिदिन अंकुरणारा... फुलणारा... बहरणारा...! या इंद्रायणीच्या एका तीराने माउलींचा Mauli ज्ञानेश्वरी तर दुसऱ्या तीराने तुकारामबुवांची गाथा... व्यास वाल्मीकिपरि फुलवली... ‘ग्यानबा-तुकाराम' या गजराने समाजाला नवसंजीवनी दिली.
 
या उज्ज्वल धवल परंपरेचे पू. जोग महाराज एक कैवल्य यात्रिक ऐन इंग्रजी लाटेच्या जोरदार धडकांच्या काळात भगवी वारकरी पताका आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी शिक्षण संस्थेची पुनर्स्थापना केली. इंग्रजी शिक्षणाच्या प्रचार-प्रसाराच्या काळात जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाची ‘प्रस्थान त्रयी' ज्ञानेश्वरी- तुकारामगाथा- एकनाथी भागवताच्या आधार भारतीय शिक्षणाचा पाया घातला. राजस्थानच्या वाळवंटात लुप्त झालेली सरस्वती... इंद्रायणी, भिमा-चंद्रभागेच्या, गोदावरीच्या रूपाने महाराष्ट्रात प्रकटली. इंद्रायणीच्या काठावरची ही दोन लोकविद्यापीठं... आळंदी-देहू... ग्यानबा-तुकाराम! जोग महाराजांनी त्यांचं पुनरुत्थान केलं. सोनोपंत दांडेकर... धुंडा महाराज देगलूरकर... तनपुरे महाराज... तुकडोजी महाराज... कैकाडी महाराज... गाडगे महाराज... यांनी या लोकविद्यापीठास चालना दिली. चैतन्य भरले... या लोक सरस्वरतीस अनेक प्रवाह येऊन मिळाले अन् प्रवाह विशाल बनला. खरं तर स्वातंत्र्योत्तर काळात याच मार्गाने आधुनिक शिक्षण प्रवाह पुनरुज्जीवित व्हायला हवा होता.
 
या प्रवाहाच्या वारीत आषाढी-कार्तिकी-तिथी वार नक्षत्र शेती-ग्राम उद्योगाची एक संपन्न उतरंड होती. ही उतरंड पिंडी ते ब्रह्मांडी एकत्व पाहणारी ज्ञानोबा माउली, Mauli नामदेव महाराज, तुकाराम बुवांच्या अभंग ओवीवर डोलणारी निष्काम कर्मयोगाची दीक्षा देणारी. समृद्ध जीवनाची वाट.
 
नारायण महाराज... नारायण जाधव बी. ए. एम. एस. झाले. आपल्या गावी... खेड्यात वारकरी कुटुंबात जन्मलेले नारायण जाधव महाराजांनी संस्कृतमधून एम. ए. पुणे विद्यापीठातून केले. याच संस्कृत अभ्यासाने आणि परंपरेने चालत आलेल्या वारकरी संस्काराने नारायण जाधवांना आळंदीला खेचून आणले. वैयक्तिक संसाराऐवजी समाजाचा, संसार गाडा चालविण्याची जबाबदारी स्वीकारून ब्रह्मचर्य पालन केले. संस्कृत अध्ययनामुळे ज्ञान भांडारच गवसले. त्यामुळे वेदउपनिषदांचे ज्ञान भारतीय तत्त्वज्ञान सर्वांपुढे मुक्तपणे ठेवता येऊ लागले. ब्रह्मज्ञान विद्या- साऱ्या विद्यांचं सार पसायदान! नारायण जाधव महाराजांच्या ज्ञान चुंबकाने युवकांत- समाजात नवचैतन्य निर्माण झाले. जाधव महाराजांचे जीवन म्हणजे पंचकोषांचे सारच जणू.
 
ज्ञान साधनेनं विद्वान एकांतप्रिय होतात. अहंकाराने मनुष्य स्वभावात एक दुरावा निर्माण निर्माण होतो. या सर्वांपासून अलिप्त होतं. महाराजांचा लोकसंग्रह वाढला. आळंदी पुन: ज्ञान साधनेचं क्षेत्र बनू लागलं. डॉक्टर महाराजांचा आश्रम एक अध्यात्म विद्येचं, ज्ञानसाधनेचं केंद्र बनलंय.
 
भारताचं आधुनिकीकरण, निधर्मीकरण जलदगतीने होत असतानाच तळागाळात ज्ञानदीप लावून भारत सुदृढ संपन्न करण्याचं काम आळंदीत नारायण जाधव महाराजांच्या सान्निध्यात राहून आता अनेक तरुण करू लागलेत. यात्रेकरू.... दुकानं- हळद, कुंकवाचे सडे... निर्माल्यानं भरून जाणाऱ्या इंद्रायणीच्या पात्रानं आता कात टाकलीय. ज्ञानसाधना भक्तिभावानं करणारा एक नवतरुण वर्ग साध्या वेशात सरळ मार्गाने जात मंद समयीच्या ज्योतीने तेवत आपापल्या जागी अंधकार दूर करू लागलाय. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली साध्वी अहल्यादेवी होळकरांचं कार्य पुन: आकाराला येऊ लागलंय... यात्रेच्या काळात गजबजणाऱ्या अनेक ज्ञाती संस्थांच्या धर्मशाळा भारत विद्येनं फुलू लागल्यात. समाजरूपी भिंतीत चेतना निर्माण होऊन क्षुद्र वादा-भेदांच्या पलीकडचा एकात्म एकरूप भारतीय समाज-
 
तुका म्हणे नाही आले अनुभवा
आधीच मी देश कैचा.... नाच?
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव।
शब्दांचे गौरव कामा नये
सारा मंडप बहरून गेला होता अंतर्बाह्य शुभ्रता धवलता...
केशराच्या देठावर फुललेली.. अंतर्यामीची मंद सुगंधित साधना
आता आळंदीत इंद्रायणी पुन:श्च दुथडी भरून वाहू लागलीय. या ज्ञानगंगेच्या काठावर मशागत खासच झालीय, पीकपाणी का नाही येणार...
बाप ज्ञानेश्वर समाधिस्त हृदयात झाला. पू. जोग महाराजांनी लावलेला फुलवंती मोगऱ्याचा वेल गगनावरी जाऊ लागलाय.
अवचिता परिमळू
झुळुकला अळूमाळू
मी म्हणू गोपाळू...
आला गं माये।