बदनेकायी हेवन !

brinjal/eggplant ही भाजी म्हणजे अक्षरश: स्वर्गच!

    दिनांक :17-Mar-2022
|
पदार्थांना विचित्र नावे देऊन, लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न अजिबातच नाही. पण, या भाजीचे हेच नाव प्रचलित आहे. बदनेकायी म्हणजे वांगी brinjal/eggplant आणि इंग्रजीत हेवन म्हणजे स्वर्ग ! आता हे नाव पारंपरिक आहे की कोणी नव्याने ठेवले आहे, याविषयी कल्पना नाही पण, बदनेकायी हेवनbrinjal/eggplant, ज्वारी/बाजरीच्या भाकरी, ठेचा आणि ही भाजी म्हणजे अक्षरश: स्वर्गच!
 

brinjal
 
साहित्य :
अर्धा किलो वांगी - थोडी लांबट, हिरवी वांगी brinjal/eggplant  घ्यावीत. ती कापून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा.
तेल - ४ चमचे
मोहरी, हळद, गोडलिंब 
३-४ लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या
१ कांदा उभा चिरलेला (लहान सांबार कांदेसुद्धा वापरू शकता)
 
कोरडा मसाला :
३ बेडगी मिरच्या
४-५ लसणाच्या पाकळ्या
पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं
आता हा मसाला पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
 
कृती :
एका उथळ पॅनमध्ये किंवा खोलगट तव्यावर तेल गरम करा. खोल कढईत ही भाजी पाणीदार होण्याची आणि वांगी brinjal/eggplant तांबूस न होण्याची शक्यता आहे. तेल तापले की मोहरी घाला. आता उभा चिरलेला कांदा आणि ठेचलेला लसूण घालून छान परतून घ्या. आता चिरलेली वांगी brinjal/eggplant घाला. हळद, कढिपत्ता घालून हलवून घ्या. झाकून ५ मिनिटे शिजवून घ्या आणि वांगी brinjal/eggplant थोडी मऊ झाली की मीठ आणि कोरडे वाटण घाला. या पदार्थात पाणी अजिबात घालायचे नाही. झाकण लावून भाजी चांगली शिजू द्या. ही खमंग-सुकी भाजी भाक-या/पोळ्यांबरोबर तर छान लागतेच पण गरम वरण-भाताबरोबरसुद्धा खूपच चविष्ट लागते. नक्की करून बघा बदनेकायी हेवन brinjal/eggplant !