अशी बनवा हयग्रीव खीर!

Haygriv kheerहे पक्वान्न नक्कीच करून बघा

    दिनांक :18-Mar-2022
|
होळीला सामान्यत: आपण पुरण करतो. पण, दक्षिण भारतात चण्याच्या डाळीची हयग्रीव खीर kheer बनवतात. नेहमीच्या गोड पदार्थांच्या ऐवजी हे पक्वान्नkheer एकदा नक्कीच करून बघा.
 
 
kheer  
  
 
साहित्य :
चणा डाळ १ वाटी
गूळ एक वाटी (जास्त गोड आवडत असेल तर जास्त घ्यावा)
ओले खोबरे
नारळाचे दूध
मूठभर काजू,बदाम, मनुका
जायफळ-वेलदोडे पूड
 
कृती:
kheer चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये पूर्णपणे शिजवून घ्या. डाळ पूर्ण शिजलेली हवी. प्रेशर उतरल्यावर डाळीमधले पाणी काढून घ्या. एका पॅनमधे शिजवलेली डाळ काढून त्यामधे आवडीनुसार गूळ मिक्स करा. दाणेदार डाळ आवडत नसेल तर गूळ घालण्याअधी मॅशरने डाळ मॅश करून घ्या. ज्या कुकरमधे डाळ शिजवली त्यातच घालून केले तरी चालेल. गूळ विरघळल्यावर त्यामध्ये आवडीनुसार ओले खोबरे घाला. आता नारळाचे दूध घालून ढवळून घ्या. मस्त क्रिमी खीर kheer तयार आहे. काजू, बदाम, मनुका तुपात परतून घ्या. आता जायफळ-वेलदोडे पूड घालून मिसळून घ्या. kheer वाढताना वरून चमचाभर तूप अथवा दूध घालून द्या.
 
हयग्रीव बनवताना पुरण गार झाले की कोरडे पडेल या अंदाजाने कन्सिस्टन्सी ठेवा. ही खीर kheer जर खूप कोरडी झालीच तर नारळाचे दूध घालून अथवा दूध घालून सारखी करता येईल. मंगलोरमध्ये देवळांमध्ये ही खीर kheer प्रसादाच्या स्वरूपात देतात. एकदा नक्कीच करून बघा