थंडगार कुलुक्की!

kulukki sarbath लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे

    दिनांक :26-Mar-2022
|
kulukki sarbath विदर्भात आता ऊन चांगलेच जाणवू लागले आहे. ऊन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वैदर्भीय खवय्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात. उन्हाच्या झळा दक्षिण भारतातही चांगल्याच जाणवतात आणि तिथे थंडगार कुलुक्कीचा kulukki sarbath आस्वाद घेऊन उकाड्यावर मात करतात. कसे बनवायचे कुलुक्की सरबतkulukki sarbath? चला जाणून घेऊया!
 
 
kulu  
 
 
kulukki sarbath साहित्य :
२चमचे सब्जा (तुळशीचे बी)
एक ग्लास थंड पाणी
एका लिंबाचा रस
एका हिरव्या मिरचीचे उभे काप
बर्फाचे खडे, चवीनुसार मीठ,साखर, पुदीना
कृती :
शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. कुलुक्की सरबत kulukki sarbath हे एक प्रकारे घुसळलेले लिंबूपाणी आहे. मल्याळममध्ये कुलुक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो. त्यावरून या पेयाला कुलक्की हे नाव पडलं. हे सरबत kulukki sarbath तयार करताना जितक्या जोरात घुसळल्या जाईल तितकी त्याची चव खुलते आणि हीच या सरबताची kulukki sarbath विशेषता आहे. कुलुक्की बनविण्यासाठी २ चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. तोपर्यंत, एका पेल्यात लिंबाची एक चकती, हिरव्या मिरचीचे काप, पुदिन्याची पाने, चवीनुसार मीठ-साखर टाका. यात आवडत असल्यास आल्याचे बारीक तुकडे पण घालू शकता. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे घाला.
 
एवढी कृती होईपर्यंत सब्जा पुरेसे भिजलेला असेल. तो या मिश्रणात टाकून मिश्रण ढवळून घ्या. आता त्यात थोडे पाणी घालून छान घुसळून घ्या. तुमच्याकडे शेकर असेल तर उत्तमच ! किंवा, दुसरा पेला घेऊन तो मिश्रणाच्या पेल्यावर ठेवून, जोरात हलवा. आता हे आंबट-गोड आणि जरासं तिखट अशी मिक्स चव असलेले थंडगार कुलुक्की सरबत kulukki sarbath तयार आहे. थंडगार कुलुक्की kulukki sarbath प्यायला चविष्ट असते. जास्त गार हवे असल्यास थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून पिऊ शकता. मिरची उभी चिरल्याने फारसे तिखट लागत नाही. शेकर किंवा बाटलीमध्ये kulukki sarbath घुसळणार असाल तर मिरच्या वगळता इतर साहित्य आधी घुसळून मिरच्या शेवटी टाकून चार पाच वेळा शेक केले तरी चव मस्तच येईल.