गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे?

GudhiPadwaकाय आहे आयुर्वेद आणि श्रीखंडाचा संबंध

    दिनांक :31-Mar-2022
Total Views |
नागपूर,
मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या GudhiPadwa दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा GudhiPadwa हा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी बांबू, रेशमी वस्त्र, तांब्याचा गडवा, आंब्याची डहाळी, कडुनिंबाची कोवळी पाने, गाठ्या यासारख्या आरोग्यास शंभर टक्के पूरक असलेल्या आणि सहज उपलब्ध वस्तू वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते. असे म्हणतात की, जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल, ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी. म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी GudhiPadwa आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवीचा समावेश केलेला असतो.
  
shr
 
 
या दिवशीGudhiPadwa गुढीला श्रीखंडाचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. आयुर्वेदात श्रीखंडला "रसाला" किंवा "शिखरिणी" म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संदर्भसुद्धा आहे. महाभारतात पांडव अज्ञातवासात होते तेव्हा भीम "बल्लव" या नावाने स्वयंपाक्याचे काम करीत होता. तेव्हाच त्याने सर्वप्रथम श्रीखंड तयार केले. नंतर, श्रीखंड खाऊन श्रीकृष्णाला गाढ झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात श्रीखंडामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्री-खंड GudhiPadwa म्हणून ओळखला जातो. श्रीखंड तयार करण्याच्या विधीवरून हे लक्षात येते की, श्रीखंड जरी कफ वाढविणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे ते कफवर्धक ठरत नाही.
  
shr 1 
 
 
गुढी पाडव्याला GudhiPadwa श्रीखंडच का खायचे?
उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्‍ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते. म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे ज्याचे शरीर अगदी शुष्क बनले आहे, ज्यांना उत्साह नाही,ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय. GudhiPadwa श्रीखंड हे पचायला थोडे जड असते, शिवाय, हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे, या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनविण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे.पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक Ayurveda विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाधते. 
 

shr 2 
आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे ?
प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये. GudhiPadwa चांगले दही लागल्यानंतर सूती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते 7-8 तासासाठी टांगून ठेवावे. जे काही पाणीरहीत दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो. आयुर्वेदिक श्रीखंडामध्ये चक्का हा खडीसाखर (मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी) घालून फेटतात आणि फेटायच्या भांड्याला कापराने धुपवलेले जाते. श्रीखंड पचविण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो. श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तूप देखील टाकतात. नंतर त्यात दालचिनी, नागकेशर, वेलची, मिरीपावडर, तमालपत्र, सुंठ याची पावडर करून मिसळले जाते. वरून थोडं केसर दूध घातले म्हणजे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते.
 
थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या GudhiPadwa परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख,समृद्धीने युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल