मुगाचं खमंग बिरडं !

marathi receipe भाज्या बनविण्याची पद्धत प्रांताप्रमाणे बदलते

    दिनांक :14-Apr-2022
|

- एक वेगळी पद्धत 
 

marathi receipe उसळी आणि भाज्या बनविण्याची पद्धत प्रांताप्रमाणे बदलते. आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने स्वयंपाक केल्यास चवीत छान बदल होतो. विशेषतः उन्हाळ्यात असा चवबदल मस्त वाटतो. हिरव्या मुगाची उसळ पण थोडी वेगळ्या पद्धतीने करण्याची रेसिपी आपण आज बघूया. महाराष्ट्राच्याच काही भागात या उसळीला बिरडं असं म्हणतात. बिरडं बनविण्यासाठी हिरवे मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे. रात्री पातळ फडक्यात बांधून ठेवायचे. दुसर्‍या दिवशी कोमटपेक्षा जरा गरम पाण्यात मोड आलेले मूग टाकावेत. marathi receipe १० मिनिटांनी मोड तुटणार नाहीत ही काळजी घेत हलक्या हाताने थोडे चुरावेत. मग भांडे हळूहळू पीठ चाळताना जशी चाळणी हलवतो तसे हलवावे. पाण्याबरोबर सालंही सुटत जातात. असे दोन-तीन वेळा केलं की, बहुतांशी साले सुटून जातात. आता हे मूग बिरडं बनविण्यासाठी तयार आहेत. 

 

birad
 
marathi receipe साहित्य :
१. सोललेले मूग २ वाट्या
२. खोवलेला ओला नारळ अर्धी वाटी  
३. १०-१२ लसणाच्या पाकळ्या
४. १/२ इंच आलं
५. दोन बारीक चिरलेले कांदे
६. कैरी मध्यम आकाराची अर्धी कैरी - चार भाग करून (सध्या कैऱ्या आहेत म्हणून त्या जागी चिंचदेखील वापरता येईल. प्रमाण असेच ठेवावे. )
७. कैरीच्या अर्ध्या प्रमाणात गूळ
८. थोडी कोथींबीर
९. तेल, हळद, हिंग, तिखट, धणेजिरे पूड, मीठ चवीनुसार 
 
marathi receipe कृती :
चार मोठे चमचे तेल तापवून त्यात हिंगाची फोडणी करावी. त्यात आधी कांदे परतावेत. कांदे लालसर झाले की त्यात मूग टाकावेत, त्यात हळद, तिखट, धणेजिरे पूड टाकावे. हे सर्व मंद गॅसवर किमान ७-१० मिनिटं परतावे. marathi receipe हे परतणे चालू असताना, ओले खोबरे, कैरीचे तुकडे व लसूण एक कप पाण्यात छान बारीक वाटून घ्यावे. आता परतलेल्या मूगात २ कप पाणी घालावे व २ उकळ्या आल्यावर झाकण ठेऊन मूग शिजू द्यावेत. मूग शिजल्यावर त्यात वाटण, गूळ, मीठ, चिरलेली कोथींबीर टाकून एक उकळी आणावी. marathi receipe खमंग आणि आंबट-गोड चवीचं बिरडं फुलक्यांसोबत किंवा नुसतंच वरून शेव-चिवडा टाकून खायला मजा येते. नक्की करून बघा मुगाचं खमंग बिरडं !