रात्रभर भिजवलेले बाजरीचे पीठ ह्या पाण्यात घाला. marathi receipe हे मिश्रण हळूहळू घाला आणि पिठलं घोटतो तसे घोटा /हलवा. ह्याला दणदणीत वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर त्यात तीळ घाला. हे मिश्रण थंड होऊ द्या. चमच्याने किंवा हाताने (हाताला थोडे तेल लावून घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही. मग, मुगवड्या घालतो तशा जाड प्लास्टिकवर घाला. उन्हात वाळवायला ठेवून द्या. चांगले खडखडीत वाळू द्या. या प्रमाणात ताटभर खारोड्या होतील. पण, त्या भरपूर दिसत असल्या तरी सहज फस्त होतात. खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे. उन्हाळ्याच्या संध्याकाळी सडा टाकलेल्या अंगणात सगळ्या बहीण-भावंडांनी मिळून असा खारोड्यांचा नाश्ता खाण्यात स्वर्गसुख आहे.