metkoot काही खास मराठी पदार्थ अलीकडे विस्मरणात गेलेले दिसतात. मात्र, त्या पदार्थांची चव ज्यांनी चाखली आहे त्यांच्या जिभेवर ती अजूनहो रेंगाळत असते. असाच एक पारंपारिक पदार्थ म्हणजे मेतकूट metkoot! दुपारच्या जेवणाआधी दिवसाची सुरवात करताना मऊ भात- तूप – मीठ आणि मेतकूट अशा आहाराची योजना आपल्याकडे आहे. शरीराला आवश्यक अशा दर्जेदार फॅटचा सोर्स म्हणजे साजूक तूप आणि वर मेतकूट metkoot ! मिक्स डाळींमधून शाकाहारी माणसाला मिळणारं प्रोटीन आणि ते सुद्धा डाळी भाजून पचायला सोप्या असणार्या पद्धतीने केलेलं मेतकूट metkoot ! सगळ्या वस्तूंचे 'मेतकूट' छान जमून आले की, चविष्ट 'मेतकूट' तयार होते. कृती देखील तितकीच सोपी आहे. कसं करायच ते बघू या.
चणा डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ कढईत वेगवेगळी खमंग भाजून घ्या. प्रत्येक डाळ भाजून झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या. तांदूळ आणि गहू/कणिकही भाजून घ्या. हिंग, हळद आणि सुंठ पावडर सोडून बाकी सगळे मसाल्याचे पदार्थ खमंग कोरडेच भाजून घ्या. metkoot
metkoot भाजलेले सगळे पदार्थ गार झाले की मिक्सरमध्ये अगदी बारीक पीठ किंवा किंचीत रवाळ असे दळून घ्या. दळून झाल्यावर हिंग, हळद आणि तिखट घालून मिक्स करा. एअर टाइट डब्यात भरून कोरड्या जागी ठेवा.
मेतकूट metkoot हे कोरडे आणि मल्टिपर्पज असल्यामुळे कधीही पटकन उपयोगी पडते. मेतकूटात metkoot तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून पोळी, भाकरी किंवा इडली आणि दोसा सोबत खायला झटपट चटणी तयार होते. तेलाऐवजी मेतकूट metkoot दह्यात कालवले तरी छान लागते. तर नक्की करून बघा खमंग आणि झटपट metkoot मेतकूट !