पुन्हा तलवारींची ऑनलाइन खरेदी

    दिनांक :04-Apr-2022
|
औरंगाबाद 
swords : कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा औरंगाबाद क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी swords जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले. अबरार शेख जमील उर्फ शाहरूख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

jhkj 
 
यापूर्वीही क्रांती चौक पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून 37 तलवारी swords आणि एक कुकरी जप्त केली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे.  औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्याने तलवारी swords का येतात. कुठुन आणि कशी येतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.