ज्योती यारराजीचा राष्ट्रीय विक्रम

    दिनांक :11-May-2022
|
नवी दिल्ली,
अखेर आंध्र प्रदेशच्या Jyoti Yarraji 22 वर्षीय ज्योती यारराजीने सायप्रसमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 13.23 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक पटकावित नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदविण्यात यश मिळविले. लिमासोल येथे सायप्रस आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत 0.1 प्रति मीटर/सेकंद अशा वेगातील वार्‍याच्या वातावरणात धावून ज्योतीने सुवर्णपदक जिंकले. 2002 पासून अनुराधा बिस्वालच्या नावावर 13.38 सेकंदाचा जुना राष्ट्रीय विक‘म होता. एक महिन्यापूर्वी कायदेशीर मर्यादेच्या पलीकडे वार्‍याच्या मदतीमुळे झालेल्या तिचा राष्ट्रीय विक्रम गणला गेला नव्हता.
 
Jyoti Yarraji
 
सायप्रस आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धा ही Jyoti Yarraji जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर श्रेणीतील ड गटाची स्पर्धा आहे. भुवनेश्वरमधील रिलायन्स फाऊंडेशन ओडिशा अ‍ॅथ्लेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जोसेफ हिलियरच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्‍या ज्योतीने गत महिन्यात कोझिकोड येथे झालेल्या फेडरेशन चषकात 13.09 सेकंदाचीा वेळ नोंदवली होती, पण वार्‍याचा वेग +2.0 मी/सेकंद असल्याने तिची कामगिरी राष्ट्रीय विक्रम म्हणून गणल्या गेली नाही.
 
 
2020 मध्येसुद्धा ज्योती Jyoti Yarraji बिस्वालच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण केली होती. तिने कर्नाटकातील मूडबिद्री येथे अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत 13.03 सेकंदाचा वेळ नोंदवला होता.परंतु राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी एजन्सीने तिची या स्पर्धेदरम्यान चाचणी केली नाही व भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाचा एकही तांत्रिक प्रतिनिधी नसल्यामुळे तिचा राष्ट्रीय विक्रम म्हणून गणल्या गेला नाही.
 
 
कोझिकोड फेडरेशन चषकादरम्यान रिलायन्स फाऊंडेशनच्या Jyoti Yarraji आणखी एक खेळाडू अमलान बोर्गोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 21.32 सेकंदाच्या विक्र‘मी वेळेसह तिसरा क‘मांक पटकावला.