कॅक्सियस,
येथे आयोजित मूकबधिरांच्या डेफलिम्पिकमध्ये भारतीय गोल्फपटू Diksha Dagar दीक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या अॅशलिन ग्रेस हिला पराभूत करून डेफलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. 2017 च्या डेफलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्या दीक्षाने यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे वचन पूर्ण केले. दीक्षा आता दोन डेफलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी एकमेव भारतीय गोल्फपटू आहे. तिने 2017 मध्ये सॅमसन, तुर्की येथे झालेल्या डेफलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि आता 2022 च्या डेफलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. लेडीज युरोपियन टूरवर शानदार विजय मिळवून 21 वर्षीय डावखुरी Diksha Dagar दीक्षाने व्यावसायिक गोल्फपटू म्हणून आपले स्थान निर्माण केले. तिने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेस जॉन्सनला चार छिद्रे शिल्लक ठेवून पराभूत केले.
वयाची सतरा वर्षे पूर्ण झाली नसताना दीक्षाने 2017 मध्ये डेफलिम्पिकमध्ये पदापर्र्ण केले व आरामात अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र तिला अमेरिकेच्या योस्ट केलिनकडून प्ले-ऑफमध्ये पराभव पत्करावा लागला. 2021 मध्ये Diksha Dagar दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली. डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही क्रीडा स्पर्धेत खेळणारी ती पहिली गोल्फपटू ठरली. 2019 च्या सुरुवातीला Diksha Dagar दीक्षाने दक्षिण आफ्रिका महिला गोल्फ ओपन स्पर्धा जिंकली. 2021 मध्ये ती आरामको टीम सीरीज लंडनमधील विजेत्या संघाची सदस्य होती. दोन्ही स्पर्धा लेडीज युरोपियन टूरचा भाग आहेत. हौशी असतानाही तिने भारतातील हिरो वुमेन्स प्रो-सर्किट गोल्फ स्पर्धा अनेक वेळा जिंकल्या. दीक्षाला श्रवणदोष आहे व तिने वयाच्या सहाव्या वर्षापासून श्रवणयंत्र वापरण्यास सुरुवात केली. फ्रान्सच्या मार्गांक्सने नॉर्वेच्या अॅण्ड्रिया होव्हत्सेनाचा पराभव करून कांस्यपदक मिळविले. अॅण्ड्रियाने 2017 डेफलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते.