घोळीचा तवा झुणका !

Gholichi bhaji खमंग भाकरीसोबत तवा झुणका हवाच

    दिनांक :12-May-2022
|
उन्हाळ्यात विदर्भात घरोघरी ताज्या आणि हिरव्यागार घोळीच्या भाजीचीGholichi bhaji हमखास उपस्थिती असते. कैरीच्या फोडी टाकून केलेली पातळभाजी असो की नुसतीच परतून केलेली भाजी Gholichi bhaji ! आज आपण घोळीची एक साधीच पण खमंग आणि खरपूस भाजीGholichi bhaji तव्यावर कशी बनवायची, हे बघूया ! 
 

ghol  
 

साहित्य :

निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली घोळीची भाजी Gholichi bhaji, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या ८-१०, दोन डाव तेल,फोडणीसाठी मोहरी,जिरे, हिंग,चिमूटभर हळद. (विदर्भात या भाजीत कैरी बारीक चिरून घालतात.)
 
कृती:

भज्यासाठी भिजवतो तसे बेसन पीठ भिजवून घ्या.आता गॅसवर तवा तापत ठेवा. तवा तापला की, त्यावर फोडणीसाठी तेल घाला. तेल चांगले तापले की त्यात मोहरी व जिरे घालून छान तडतडले की हळद,हिंग ,लसूण ,चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या. मग त्यात घोळभाजीची पाने Gholichi bhaji घालून चांगले परता, आता त्यावर भज्याचे भिजवून ठेवलेले पीठ घालून सराट्याने मिक्स करून घेऊन नंतर झुणक्याची खरपुडी होईपर्यंत परता. हा खमंग घोळ भाजीचा तवा झुणका Gholichi bhaji मऊ पोळी किंवा खमंग भाकरीसोबत सर्व्ह करा.