सुंदरगडमध्ये देशाचे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम

    दिनांक :12-May-2022
|
राऊरकेला, 
ओडिशाच्या आदिवासीबहुल सुंदरगढ जिल्ह्यातील राऊरकेला शहरात देशातील सर्वात मोठे Hockey stadium हॉकी स्टेडियम- बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय Hockey stadium हॉकी स्टेडियम उभारले जात असून स्टेडियमचे बांधकाम जोरात सुरू आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात याच स्टेडियमवर एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. टोकियो ऑलिम्पिकचे कांस्यपदक जिंकणार्‍या भारतीय Hockey stadium हॉकी संघासाठी तब्बल 20,000 समर्थक या स्टेडियममध्ये येणार आहेत. भारतीय हॉकी संघसुद्धा भुवनेश्वरमध्ये 2018 सालच्या हॉकी विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार नाही तर विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचाही प्रयत्न करतील.
 
 
SUNDARGARH-STADIUM
 
Hockey stadium राऊरकेलामध्ये गत वर्षी स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामही ठरवलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सुमारे चारशे कामगार अहोरात्र झटत आहे. चोवीस तास काम सुरू आहे. साधारणतः या आकाराचे स्टेडियम तयार करण्यासाठी सुमारे 18-24 महिने लागतात. परंतु, आम्ही अशा प्रकारे डिझाइन व नियोजन केले आहे की या कार्यात आम्ही वेळ वाचवू शकू व कालमर्यादेत काम पूर्ण करू शकू, असे क्रीडा विभागाच्या पायाभूत सुविधांचे सल्लागार स्वागत सिंग यांनी सांगितले.
 
 
 
200 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या Hockey stadium स्टेडियमच्या बांधकामाची जबाबदारी ओडिशाचे औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळावर असून त्यांना या स्टेडियमच्या बांधकामाचे कंत्राट लार्सन व टुब्रोला दिले आहे. सराव खेळपट्टीजवळील 80 कोटींचे निवासस्थान दुसर्‍या कंत्राटदाराद्वारे केले जात आहे व त्याची अंतिम मुदत ऑक्टोबर आहे, असे अधिकार्‍याने सांगितले. 35 एकर जागेत बिजू पटनायक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या 120 एकर परिसरात स्टेडियम व निवास व्यवस्था समाविष्ट आहे. राजधानी भुवनेश्वरच्या वायव्येस 293 किमी अंतरावर असलेल्या राऊरकेला येथे उभारत असलेल्या या Hockey stadium स्टेडियमचे बांधकाम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. Hockey stadium स्टेडियमचे जवळपास 50-60 टक्के काम पूर्ण झाले आहे, असे स्वागत सिंग यांनी सांगितले. विश्वचषकापूर्वी, स्टेडियमची चाचणी म्हणून ऑक्टोबर अखेर प्रो-लीग हॉकी सामने आयोजित करण्याची योजना आहे.