पंजाबविरुद्ध बंगळुरूचे पारडे जड

    दिनांक :12-May-2022
|
मुंबई, 
पंधराव्या IPL इंडियन प्रीमियर लीगच्या अखेरच्या टप्प्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आवश्यक गती मिळाली आहे. आता शुक‘वारी आरसीबी संघर्षरत पंजाब किंग्सविरुद्ध विजय नोंदवून प्ले-ऑफमधील आपले स्थान मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करतील. पंजाबही प्ले-ऑॅफच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्नांत असेल. गुणतालिकेत गुजरात (18 गुण), लखनौ (16 गुण) व राजस्थान (14) हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, तर बंगळुरू 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीचे 12 गुण आहे, तर हैदराबाद, कोलकाता व पंजाबचे प्रत्येकी 10 गुण आहेत. गत दोन समन्यात जबरदस्त विजयी कामगिरी करीत आरसीबीने आपल्या सर्वोत्तम संघबांधणीचा पर्याय शोधून काढला आहे.
 

faf  
 
IPL आरसीबीने गत दोन सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 67 धावांनी, तर चेन्नईस सुपर किंग्सवर 13 धावांनी विजय मिळविला. विराट कोहली वगळता बंगळुरूचे सर्व फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. नवोदित रजत पाटीदार व महिपाल लोमरर हे सुद्धा कर्णधार फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल व दिनेश कार्तिकसार‘या अनुभवी खेळाडूंना मदतशीर ठरत आहे. कार्तिक तर गुजरातच्या राहुल तेवतियाप्रमाण स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशर आहेत. जोश हेझलवूड, हर्षल पटेल व मोहम्मद सिराज हे बंगळुरूचे भरवशाचे खेळाडू आहेत. ग्लेन मॅक्सवेलची फिरकी पॉवरप्ले आणि मधल्या षटकांमध्ये उपयुक्त ठरत आहे, तर वानिंदू हसरंगा पाच बळींसह एकूण 21 बळी टिपत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे.
 
 
IPL तिकडे पंजाबचे तीन सामने शिल्लक असून त्यांना अव्वल चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्व जिंकणे आवश्यक आहे. पंजाबने आरसीबीवर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. आता पंजाब पाच विजय व सहा पराभवांसह 10 गुणांवर आहेत. त्यांना सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कर्णधार मयंक अग्रवालला अतिशय चतुराईने संघनेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा व जॉनी बेअरस्टोला अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. आघाडीचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने 18 बळी टिपण्याची चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याला संदीप शर्मा, अर्शदीप सिंगची साथ मिळणे अपेक्षित आहे.
IPL