हॉकी विश्वचषकात अव्वल चारमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य

    दिनांक :12-May-2022
|
- गोलरक्षक सविता पुनियाचा निर्धार

बंगळुरू, 
चार वर्षांपूर्वी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर आता या वर्षीच्या एफआयएच महिलांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत व्ल चारमध्ये पोहोचणे हे संघाचे लक्ष्य आहे, असे भारतीय महिला हॉकी संघाचे गोलरक्षक Savita Punia सविता पुनिया म्हटले आहे. जुलै महिन्यात नेदरलॅण्ड व स्पेनच्या संयुक्त यजमानपदाखाली हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करयात येणार आहेत. लंडनमध्ये 2018 साली झालेल्या हॉकी विश्वचषकात भारताला पेनॉल्टी शूट-आऊटमध्ये आयर्लण्डकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला व स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते, परंतु यावेळी भारतीय संघ पदकाच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वासही Savita Punia सविताने व्यक्त केला आहे.
 
 
SAVITA-PUNIA-2
 
Savita Punia संघातील बहुतांश खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यात तसेच अव्वलसंघांविरुद्ध सामन्याच्या परिस्थित खेळण्याचा अनुभव मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही विश्वचषकासाठी एक मजबूत संघ तयार करण्याच्या योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत, असेही ती म्हणाली. आम्ही लंडनमध्ये गत वेळी विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलो होतो, मात्र या वेळी निश्चितपणे पुढील स्तरावर पोहोचण्याचे लक्ष्य आहे, असे ती म्हणाली. हॉकी विश्वचषक स्पर्धा 1 ते 17 जुलै दरम्यान होणार आहे, परंतु त्यापूर्वी बेल्जियममधील एफआयएच प्रो-लीग सामन्यांमध्ये भारतीय संघाला खेळण्याची संधी मिळेल. 11 व 12 जून रोजी भारतीय संघ यजमान बेल्जियमविरुद्ध सामना खेळणार आहेत.
 
 
Savita Punia दोन सामने नेदरलॅण्डमध्ये आठवड्याच्या शेवटी खेळले जातील. तिथे भारतीय संघ 18 व 19 जून रोजी अर्जेंटिना आणि 21 व 22 जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळेल. भारतीय महिलांना विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड, चीन व न्यूझीलंडच्या बरोबरीने गट ‘ब’ मध्ये ठेवण्यात आले आहे. 3 जुलै रोजी अ‍ॅमस्टेलवीन येथे भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करतील.