कोलंबियामध्ये सहायक वैद्यकीय आत्महत्येला मान्यता

- ठरला पहिला लॅटिन अमेरिकन देश

    दिनांक :13-May-2022
|
बोगोटा, 
Medical suicide डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांसाठी सहायक वैद्यकीय आत्महत्या अधिकृत करणारा कोलंबिया हा पहिला लॅटिन अमेरिकन देश बनला आहे. या निर्णयानंतर कोलंबियात गंभीर आजाराचा सामना करणारे रुग्ण आत्महत्येसाठी वैद्यकीय कर्मचार्‍यांची मदत घेऊ शकणार आहेत. याबाबत कोलंबियाच्या घटनात्मक न्यायालयाने निर्णय जाहीर केला आहे.
  
Medical suicide
 
Medical suicide डॉक्टर तुरुंगात जाण्याचा धोका न घेता, गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला प्राणघातक औषध देऊन त्याला आत्महत्या करण्यास मदत करू शकतात, असे कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले आहे. शारीरिक दुखापती किंवा गंभीर आणि असाध्य रोगामुळे उद्भवलेल्या तीव‘ शारीरिक किंवा मानसिक वेदना सहन करणार्‍या व्यक्तींनाच अशा आत्महत्येस परवानगी दिली जाईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. कोलंबियात इच्छामरणाला आधीच परवानगी असून, 1997 पासून येथे हा कायदा लागू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 1997 पासून कोलंबियात 200 पेक्षा कमी लोकांनी इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे.

इच्छामरण आणि सहाय्यक आत्महत्या यात फरक काय?
राईट टू डाय विथ डिग्निटी फाऊंडेशननुसार, इच्छामरण आणि सहायक आत्महत्या यातील फरक मूळतः औषधे कोण देतो, याच्याशी जोडलेला आहे. इच्छामरणात आरोग्य कर्मचार्‍याकडून औषध दिले जाते, ज्यामुळे मृत्यू होतो तर सहायक आत्महत्येत रुग्ण स्वत:च औषधे घेतो, जी इतर व्यक्तीद्वारे देण्यात आलेली असतात.