देशमुखांची 'ती' मागणी न्यायालयाने नाकारली

    दिनांक :13-May-2022
|
deshmukh  
 
मुंबई,
Deshmukh मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी नाकारली. शिवाय जेजे रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्लाही दिला आहे. देशमुख यांनी खासगी रुग्णालयात डिस्लोकेशन शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी हलवण्याची परवानगी मागितली होती. तथापि, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या याचिकेला विरोध केला आणि सांगितले की, जेजे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी पात्र डॉक्टर आहेत. न्यायालयाने देशमुख Deshmukh यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्यावर जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि उपचार होऊ शकतात असे सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.