लाडूचा प्रसाद मिळण्यास आणखी विलंब

- विठूरायाच्या भाविकांमध्ये नाराजी

    दिनांक :13-May-2022
|
पंढरपूर, 
Laddu prasad मंदिर समितीच्या सावळ्या गोंधळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लाखो भाविकांना विकत मिळत असलेला लाडू प्रसाद बंद आहे. आता निविदा प्रकि‘येबाबत आक्षेप घेत एक संस्था न्यायालयात पोहाचल्यामुळे अजूनही विठूरायाच्या भक्तांना लाडू प्रसादासाठी वाटच पाहावी लागणार आहे. यापूर्वी अनेक महिने फक्त निविदा उघडायला वेळ नसल्याने भाविकांना हा लाडूचा प्रसाद मिळत नव्हता.
  
Laddu prasad
 
Laddu prasad मंदिर समितीच्या बैठकीत अखेर निविदा उघडण्यास मुहूर्त मिळाला आणि 9 निविदा धारकांपैकी केवळ दोघांना यात पात्र केल्याने गेल्यावेळी ज्या संस्थेकडे निविदा होते त्याने या प्रकि‘येला आक्षेप घेतला आहे. आता ही संस्था न्यायालयात गेल्याने भाविकांना मात्र आपल्या गावाकडे जाताना लाडूच्या प्रसादाशिवाय परत जावे लागणार आहे. यामुळे भाविक तीव‘ संतापले असून, आम्ही देवाच्या दर्शनानंतर घरी कोणता प्रसाद न्यायचा, असा प्रश्न आता विचारत आहेत.
 
  
Laddu prasad गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक‘ी करण्यास सुरुवात केली होती. वारकर्‍यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाल्याने वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक‘ी होऊन समितीला यातून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात हा लाडूचा प्रसाद समितीने बंद केला, मात्र यानंतर राज्यातील सर्व मंदिरे सुरू होताच सर्व मंदिरांत प्रसाद विक‘ी सुरू झाली होती. परंतु, विठ्ठल मंदिरात लाडूच्या प्रसादाचे ई-टेंडर डिसेंबर 2020 मध्ये काढण्यात आले होते. याला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर याचा अहवाल विधि व न्याय विभागाकडून मागवण्यात आला. हा अहवालदेखील प्राप्त झाला तरी, या निविदा उघडण्यात आल्या. मात्र, जानेवारी 2018 पासून जी सुवर्ण क‘ांती महिला बचत गट हे काम करत होते त्यांनाच अपात्र ठरवल्याने या संस्थेचे कायदेशीर सल्लागार दत्तात्रेय फडतरे यांनी आता या प्रकि‘येच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Laddu prasad विठ्ठलाच्या लाडू प्रसादातून समितीला वर्षाला 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न होत असते. ही सदोष निविदा प्रकि‘या राबवणार्‍या अधिकार्‍याच्या पगारातून मंदिराचा झालेला तोटा वसूल करण्याची मागणीदेखील न्यायालयात करणार असल्याचे अ‍ॅड. खडतर यांनी सांगितले. एक तर निविदा वेळेत उघडली नाही आणि आता प्रकि‘या सदोष राबवल्याच्या आरोपाने पुन्हा विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद लटकणार असून, भाविकांनी मात्र मंदिर समितीच्या या भोंगळ कारभाराबाबत तीव‘ नाराजी व्यक्त केली आहे.