D-Company राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाऊदच्या डी-कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या डी कंपनी प्रकरणात दोन संशयितांना अटक केल्याचे वृत्त आहे. या संशयितांना शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या आठवड्यात एनआयएने जवळपास २९ ठिकाणी शोध घेतला होता. अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित छोटा शकीलचे सहकारी असल्याचे पुढे येत आहे. एका वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आरिफ अबुबकर शेख (५९) आणि शब्बीर अबुबकर शेख (५९) अशी आहेत.