सतर्क होत योग्य निर्णय घेण्याची वेळ

The Kashmir Filesहिंदूंवर ठरवून अत्याचार केले

    दिनांक :13-May-2022
|
अग्रलेख
The Kashmir Files कुठल्याही परिस्थितीत आपला दुष्प्रचार करण्याचा कार्यक्रमच जनतेपुढे राहील असा प्रयत्न करायचा, मूळ प्रश्नाला बगल द्यायची, पीडितांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे आणि दुष्प्रचार करताना देशाचे अतोनात नुकसान करायचे, हा उद्योग आज जोरात सुरू आहे. ज्यांनी हा उद्योग तेजीत आणला आहे, त्यांना वठणीवर आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण आजच अशा ढोंगी लोकांचा बुरखा फाडला नाही, तर उद्या येणा-या संकटाशी कसा मुकाबला करणार, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याची गरज आहे. The Kashmir Files देशाला बदनाम करण्याच्या आपल्याच देशातील महाभागांना विदेशी शक्तींचीही मोठी मदत मिळते आणि अशी मदत स्वीकारताना ही मंडळी देशहित विसरतात, हे सगळ्यात मोठे दुर्दैव होय. विदेशी शक्ती अतिशय योजनाबद्ध पद्धतीने अशा कटांमध्ये सामील होतात आणि आपल्याच देशातील काही ‘सेलिब्रिटींना' हाताशी धरून देशविरोधी अपप्रचाराला वेग देतात, हे लपून राहिलेले नाही.
 

अग्रलेख  
 
The Kashmir Files दिल्लीच्या Delhi सीमांवर शेतक-यांचे जे आंदोलन झाले आणि संपूर्ण देशाची जगात बदनामी करण्यात आली, त्यावेळी विदेशी शक्तीचा त्यातील हात किती खोलवर पोहोचला होता, हे जनतेने अनुभवलेच आहे. राकेश टिकैत या स्वयंघोषित नेत्याच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात खरे शेतकरी सहभागी झाल्याचे कुणीही पाहिले नाही. त्यामुळे ते आंदोलन कुणाचे होते, हे वेगळे सांगण्याचीही आवश्यकता नाही. हे सगळे आता पुन्हा याठिकाणी नमूद करण्याचे कारण काय? कारण आहे. काश्मिरी पंडित आणि हिंदूंवर १९९० च्या दशकात जे अनन्वित अत्याचार झाले, त्यांच्या हत्या करण्यात आल्या, त्यांना खो-यातून पलायन करण्यास भाग पाडण्यात आले, ते वास्तवदर्शन घडविणारा ‘द काश्मीर फाईल्स' The Kashmir Files हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या सिनेमाला देशवासीयांनी भरभरून प्रतिसादही दिला आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सिनेमागृहांमध्ये जाऊन सिनेमा पाहिला आहे. सिनेमा The Kashmir Files पाहून हिंदू जनमानस संतप्त झाल्याचेही देशाने पाहिले आहे.
 
 
 
असे असतानाही या सिनेमाविरुद्धचा दुष्प्रचार आजही अतिशय योजनाबद्ध रीतीने सुरू आहे, ही व्यथित करणारी बाब आहे. या सिनेमाची कहाणी कपोलकल्पित, जनमानसात द्वेष वाढविणारी आणि एकतर्फी आहे, असे सांगत सत्य दडपण्याचा सुरू असलेला अश्लाघ्य प्रयत्न हा देशाविरुद्धच्या मोठ्या कारस्थानाचा भाग आहे आणि यासंदर्भाने राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आताच सतर्क होणेही तेवढेच गरजेचे आहे. काँग्रेस Congress, राष्ट्रवादी काँग्रेस NCP, आम आदमी पार्टी AAP, नॅशनल कॉन्फरन्स National Conference यासारख्या राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही याआधी ‘द काश्मीर फाईल्स'विरुद्ध गरळ ओकल्याचे आपण पाहिलेच आहे. असे करण्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. दाढ्या कुरवाळण्याच्या स्पर्धेत भाजपेतर सर्वच पक्ष आघाडीवर आहेत आणि यांच्या आघाडीवर कुठाराघात करणे हे प्रत्येक देशभक्त हिंदू नागरिकाचे कर्तव्य ठरते.
 
केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांनीच काश्मीर फाईल्सविरुद्ध The Kashmir Files गरळ ओकली, अपप्रचार केला असे नव्हे, तर देशात राहून देशाची बदनामी करण्यात आघाडीवर असणारे स्वयंघोषित विचारवंत, स्वयंघोषित चित्रपट समीक्षक यांनीही या चित्रपटाची बदनामी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दुष्प्रचारही एवढ्या पद्धतशीरपणे करण्यात आला की, सिनेमाच्या प्रचंड यशानंतरही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचा मूळ प्रश्न दुर्लक्षितच राहिला. ज्या पंडितांनी अन्याय, अत्याचाराला कंटाळून काश्मीर खोèयातून काढता पाय घेत देशाच्या अन्य भागात आश्रय घेतला होता, त्या पंडितांची घरवापसी कधी आणि कशी होईल, होईल की नाही, यावरील लक्ष इतरत्र वळविण्यात अपप्रचार करणा-या देशविरोधी शक्तींना दुर्दैवाने यश आले, हे नमूद करताना दु:ख होते आहे. The Kashmir Files काश्मिरी हिंदूंवर पलायनाची वेळ का आली आणि त्यासाठी कोणकोणते राजकीय पक्ष जबाबदार आहेत, यावरच चर्चा जास्त झाली आणि अजूनही होते आहे, हे सगळ्यात मोठे दुर्दैव होय. अशी चर्चा करण्यात भाजपाचा समावेश जरी केला तरी मूळ प्रश्न सुटत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
The Kashmir Files हिंदूंवर ठरवून जे अत्याचार करण्यात आले होते, त्यांची संपत्ती लुटण्यात आली होती, महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्यात आला होता, त्यावर चर्चा करायला काँग्रेस, राष्ट्रवादी, आम आदमी पार्टी तयार नाही. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लाही काही बोलायला तयार नाहीत. मात्र, ‘द काश्मीर फाईल्स' The Kashmir Filesया सिनेमामुळे कसे समाजमन कलुषित झाले आहे, हे सांगायला हे लोक आघाडीवर असतात. त्यांना काश्मिरी पंडितांच्या व्यथांची, त्यांच्या घरवापसीची कुठलीही चिंता असल्याचे दुर्दैवाने दिसत नाही. शेवटी एक गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे काश्मिरी पंडितांची फसवणूकच झाली आहे, त्यांच्या पदरी अद्याप काहीही पडले नसल्याने आपण फसविले गेलो आहोत, अशी त्यांची भावना झाली आहे. ही भावना मिटवायची असेल तर त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने आणि गांभीर्याने मार्गी लावला गेला पाहिजे. गतकाळात शेतक-यांचे आहे असे भासवत आंदोलन केले गेले, शेतक-यांच्या हिताचे कायदे मागे घेण्यास सरकारला बाध्य करण्यात आले, सरकारसह जनतेलाही वेठीस धरण्यात आले; ते पाहता ख-या शेतक-यांच्या पदरात तर काहीच पडले नाही.
 
The Kashmir Files तीन कृषी कायद्यांमुळे सामान्य शेतक-यांचे तर कल्याणच होणार होते. पण, सुपारी घेतलेल्या देशांतर्गत मोदी विरोधकांनी विदेशी शक्तींच्या मदतीने कायदे मागे घेण्यासाठी सरकारवर अनैतिक दबाव आणला. आंदोलनाआड देशविरोधी कारवायांना खतपाणी घातले, याचा विसर पडता कामा नये. सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यानेही राकेश टिकैतसारख्या लोकांना बळ मिळाले होते, हे सत्यही नजरेआड करून चालायचे नाही. शेतकèयांच्या नावावर झालेल्या आंदोलनात प्रारंभापासूनच खलिस्तानी तत्त्वांचा समावेश होता, याची माहिती सगळ्यांनाच होती. तरीसुद्धा ही बाब गांभीर्याने का घेण्यात आली नव्हती, याचे आजही आश्चर्य वाटते. The Kashmir Files काही दिवसांपूर्वी पंजाबच्या पतियाळा येथे जे हिंसक आंदोलन झाले, मोठा हिंसाचार झाला, त्या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असलेल्या खलिस्तान्याला अटक करण्यात आली आहे आणि हा खलिस्तानी त्याच्या कुख्यात साथीदारांसह टिकरी बॉर्डरवर राकेश टिकैतच्या आंदोलनात सामील होता, याकडे कसे दुर्लक्ष करता येईल?
 
शेतक-यांचे नाव वापरून देशाला वेठीस धरण्यासाठी जे आंदोलन केले गेले, त्या आंदोलनात देशविघातक तत्त्वांचा समावेश होता हे नंतरच्या काळात समोर आलेच होते. The Kashmir Files २६ जानेवारी रोजी, देशाच्या प्रजासत्ताक दिनी आंदोलक लाल किल्ल्यावर चालून गेले. तिथे त्यांनी जबरदस्त हिंसाचार केला, तोडफोड केली. त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला धक्का पोहोचला होता, यात शंका नाही. एवढे सगळे घडल्यानंतरही देशातले स्वयंघोषित विचारवंत सरकारवरच तुटून पडले. अशी घटना सरकारनेच मुद्दाम घडवून आणली असा आरोप करण्यातही हे ढोंगी मागे नव्हते. शिवाय, पोलिसांनी गोळीबार का केला नाही, असा प्रश्न विचारत सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आपला अपप्रचाराचा अजेंडा पुढे करण्यात ही मंडळी यशस्वी झाल्याचे देशाने पाहिले, अनुभवले. लाल किल्ल्यावरील हिंसाचाराआडून सरकार शेतक-यांचा आवाज दडपू पाहात असल्याचा अपप्रचार करण्यातही या ढोंग्यांना कमालीचे यश मिळाले, ही बाब अतिशय वेदनादायी आहे.
 
The Kashmir Files सरकारला खोटे ठरविण्यासाठी रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मियां खलिफा यांचाही वापर करीत बेशरमपणाची हद्द ओलांडताना या लोकांना ना लाज वाटली ना खंत! एवढेच काय, देशात जी अराजकता माजली आहे, ती नियंत्रणात आणण्यात सरकार आणि सुप्रीम कोर्टही हतबल ठरले, असा अपप्रचार करण्यात आणि देशाची बदनामी करण्यातही हे ढोंगी स्वयंघोषित विचारवंत यशस्वी ठरले. ही बाब भारतीय लोकशाहीला मारक आहे, हे सत्य सामान्य भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे आणि येणा-या निवडणुकांमध्ये या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. The Kashmir Files तरच जगातली सगळ्यात मोठी लोकशाही टिकून राहील. प्रसारमाध्यमांचा एक मोठा गटही अशा अपप्रचारात आघाडीवर होता, ही बाबही दुर्लक्षित करून चालणार नाही. अशी माध्यमं कोणती हे ओळखून त्यांच्यावर बहिष्कारास्त्र उगारून जनतेने त्यांनाही जागा दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. जे शेतकरी कायद्यांच्या बाबतीत घडले, तेच काश्मिरी पंडितांच्या बाबतीत घडू नये, एवढीच अपेक्षा!