जगातील सर्वांत मोठ्या आकाराच्या हिर्‍याची विक्री

- 1 अब्ज 69 लाख रुपयांची लागली बोली

    दिनांक :13-May-2022
|
जीनिव्हा, 
Diamond जगातील सर्वात मोठ्या हिर्‍याची नुकतीच एका लिलावात विक्री झाली आहे. या पांढर्‍या शुभ‘ हिर्‍याचे नाव ‘द रॉक’ असे असून, या हिर्‍याची स्वित्झर्लंडमधील जीनिव्हामध्ये लिलावात सर्वाधिक बोली लागल्यानंतर 1 अब्ज 69 लाख रुपयांमध्ये विक‘ी झाली. मात्र, हा हिरा नक्की कोणाला विकला गेला, याची माहिती आयोजकांनी जाहीर केलेली नाही.
  
Diamond
 
Diamond जगातील सर्वात मोठ्या आकाराचा हिरा असल्याने या हिर्‍याची विक्री झाल्यास बरेच विक‘म मोडीत निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अशा दागिन्यांच्या विक‘मापेक्षा ही किंमत खूपच कमी मानली जात आहे. स्विस शहरात 2017 मध्ये 163.41 कॅरेटचा सर्वात महागडा हिरा 33.7 दशलक्ष डॉलर किमतीला विकला गेला होता. ‘द रॉक’ हिरा हा जागतिक विक‘म मोडेल अशी खूप आशा होती. मात्र, या हिर्‍याची अपेक्षेपेक्षा कमी किमतीला विक्री झाली असल्याचे बोलले जात आहे.
 
 
Diamond ‘द रॉक’ हा जगाील सर्वात मोठ्या आकाराचा पांढरा हिरा आहे. हा हिरा 228.31 कॅरेटचा असून आकाराने एका गोल्फ बॉलपेक्षा मोठा आहे. हा हिरा उत्तर अमेरिकेतील एका व्यक्तीकडे होता. त्याच्यावर केलेल्या कारवाईनंतर लिलाव करणार्‍या व्यक्तीने हा हिरा विकत घेतला. हा हिरा दोन हजार दशकांच्या सुरुवातीला दक्षिण आफि‘केतील एका खाणीतून काढण्यात आला होता. जीनिव्हामध्ये लिलाव होण्यापूर्वी हा हिरा दुबई, तायपेयी आणि न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आला होता.