सातव्या वेतन आयोगाच्या थकीत हप्त्यासाठी निवेदन

भाजपा शिक्षक आघाडीचे शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

    दिनांक :14-May-2022
|
तभा वृत्तसेवा
नेर, 
सातव्या वेतन आयोगाच्या 7th pay commission थकीत हप्त्यासाठी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचार्‍यांना जानेवारी 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2019 मध्ये म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर राज्य सरकारी कर्मचार्‍यांना हा वेतन आयोग लागू केल्याने वाढलेल्या वेतनाच्या थकीत रकमेच्या पाच हप्त्यांपैकी केवळ पहिलाच हप्ता अदा करण्यात आला.
 
7th pay commission
 
जूलै 2020मध्ये देय असलेला थकबाकीचा दुसरा हप्ता अजूनपर्यंत सेवारत शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शासनाने दिलेला नाही. त्यातच शासनाने नुकताच तीसरा हप्ता देण्याची घोषणा केली आहे. दुसरा हप्ताच कर्मचार्‍यांना मिळाला नसताना तिसरा हप्ता कसा मिळणार? यासाठी यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी यवतमाळ जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत व भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक अधीक्षक जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. दुसरा हप्ता शिक्षकांना तत्काळ अदा करण्यात येवून तिसरा हप्ता 7th pay commission अदा करण्यासंबंधीची कार्यवाही करावी या संबंधीचे निवेदन सादर करण्यात आले.
 
 
शिक्षकांना थकीत हप्त्याची 7th pay commission रक्कम ताबडतोब अदा करण्यासंबंधी कार्यालयाकडून प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांच्याकडून भाजपा शिक्षक आघाडीच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आली. अमरावती विभाग संयोजक डॉ. नितीन खर्चे, जिल्हा संयोजक प्रा. उदय कानतोडे, जिल्हा सहसंयोजक मनोज दुधे, कृष्णा माकोडे, देवेंद्र प्रसाद पाली निवेदन देताना उपस्थित होते.