शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी...11 व्या हप्त्याची यादी जाहीर
दिनांक :14-May-2022
|
नवी दिल्ली,
farmers पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम लवकरच जारी करणार आहेत. दरम्यान या योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे की नाही लवकरच तुम्ही तपासा. या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे हे खाली दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला लक्षात येईल. माहितीनुसार पीएम किसान farmers योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान जारी केला जातो. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान जारी केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवले जातात. म्हणजेच या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हप्त्याचे पैसे जमा होतील.