तभा वृत्तसेवा
हदगाव,
हदगाव तालुक्यात शेतकरी Buy a gram हिताचा दूरदृष्टीचा एकही नेता न मिळाल्यामुळे शेतकर्यांच्या समस्या सातत्याने वाढतच आहेत. जो काही शेतकरी वर्गाचा हिताचा वर्ग उदयास आहे त्याची पृष्ठभूमी लुटारू व जातीय द्वेशाची असल्यामुळे शेतकरी वर्गाला समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागत आसल्याचे चित्र आहे.
सध्या हदगाव खरेदी विक्री Buy a gram संघाकडून हरभरा खरेदी केला जात नसल्याने संतप्त शेतकरी वर्गाने तहसीलदाराकडे अंतिम मार्गाचा अवलंब करत 25 मे पर्यंत हरभरा खरेदी केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यात गंगाधर कदम (फळी), चांदराव जाधव (वाटेगाव), संतोष सूर्यवंशी (हडसणी), गजानन कदम (फळी), सीताराम कदम (फळी) यांचा समावेश आहे. त्यांनी हदगाव खरेदी विक्री संघ येथे हरभरा खरेदीसाठी रितसर ऑनलाईन प्रक्रिया केली आहे. परंतु केंद्राकडून हरभरा खरेदी अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
येणारा हंगाम लक्षात घेता शेतकर्यांना Buy a gram बियाणे, खते, कीटकनाशके, विविध शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी नियोजन करावे लागते. त्यातच हरभरा खरेदीसाठी पणन महासंघाने 29 मे ही अंतिम मुदत दिल्याने शेतकर्यांच्या समस्यात भर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 25 मे च्या आत हरभरा खरेदी करण्याची विनंती शेतकर्यांनी केली आहे. 25 मे पर्यंत खरेदी विक्री संघाने हरभरा खरेदी न केल्यास 27 मे रोजी तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकर्यांनी दिला आहे.