गेवराई,
Chief Minister : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. विशेषतः आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेसंदर्भात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, अडीच वर्षानंतर आज मुख्यमंत्री मास्क काढून आपला चंद्रासारखा सुंदर चेहरा दाखवणार आहेत. मात्र, त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याची टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

Chief Minister : गेवराई तालुक्यातील ३२ वर्षीय शेतकऱ्याने एक एकर उसाला आग लावून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाची सांत्वना भेट घेतल्यानंतर खोत म्हणाले, हे सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही. साखर कारखानदार आता मक्तेदार असल्यासारखे वागू लागले आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे गार्भियाने पाहिले नाही. त्यामुळेच हिंगणगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली.