अँटी-शिपबॅलेस्टिक मिसाईलची चाचणी करतोय चीन

    दिनांक :14-May-2022
|
बिजिंग,
चीन China टकलामाकान वाळवंटातील शिनजियांगच्या ग्रामीण भागात एंटी शिप बॅलेस्टिक मिसाइल्सची चाचणी करत आहे. सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून सापडलेल्या पुराव्यांवरून चीन बॅलेस्टिक मिसाइल्सची चाचणी करत असल्याचं निदर्शनात आलं आहे. यूएस नेव्हल इन्स्टिट्यूटच्या मते, या हायपरसॉनिक अँटी-शिप बॅलेस्टिक मिसाइल्स युद्धनौकांसाठी महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात. अशाप्रकारच्या एंटी शिप बॅलेस्टिक मिसाइलच्या चाचण्या चीनने अनेकदा घेतल्या आहेत.

China missile tests 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यातील संभाव्य संघर्षांना तोंड देण्यासाठी China चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी या दूरच्या भागात नवीन लक्ष्यांवर लष्करी सराव करत आहे. आतापर्यंत चीनने दोन प्रकारच्या मिसाइल्सची चाचणी केली आहे. ज्या DF-21D आणि DF-26 जमिनीवर आधारित आहेत. याशिवाय H-6 बॉम्बर आहे आणि टाइप-055 रेन्हाईची देखील चाचणी केली गेली आहे.
 
आणखी एक नौदल तळ नैऋत्येस सुमारे 190 मैलांवर आहे. हे ठिकाण डिसेंबर 2018 मध्ये तयार करण्यात आलं होतं. मात्र आतापर्यंत ते लक्षात आले नव्हते, सॅटेलाइट इमेजेसवरून गोलांची रूपरेषा अतिशय अचूक लक्षात येत आहे. ओरिएंटेशन्स, शेप्स आणि साईज अनेक लक्ष्यांशी संबंधित आहेत. जमिनीवर धातूचे पत्रे टाकल्याचे दिसून येत आहे. ते उष्णता किंवा रडार वेगळ्या प्रकारे परावर्तित करू शकते.