नागरिकांना योग्य माहिती देवून जनजागृती कराजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक

    दिनांक :14-May-2022
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
मान्सून कालावधीत Collector instruction वीज पडणे, नदी नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग इत्यादी विविध बाबींमध्ये निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी काय करावे व काय करू नये, याबाबत नागरिकांना योग्य माहिती देवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
 
Collector instruction
 
मान्सून पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. या आढावा बैठकीला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनीष राजभोज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, सर्व नगरपरिषद मु‘याधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी प्रामुख्याने Collector instruction उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकारी येडगे Collector instruction यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील पूरप्रवण गावांची ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहातील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे बळकटीकरण व डागडूजी ही कामे मे महिन्यापुर्वी करण्याचे व जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करणे, धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणार्‍या गावकर्‍यांना धरणातून होणार्‍या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देणे इत्यादी बाबत कृती आराखडा तयार ठेवण्याचे त्यांनी सांगितले.
 
 
पुराच्या पाण्यामुळे ज्या गावात संपर्क तुटतो अशा अतिसंवेदनशील गावांची यादी करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. बचाव पथकासाठी उपलब्ध असलेले जेसीबी, क‘ेन, गाडी, ट्रक, व्हॅन, मॅनपावर इत्यादी साहित्य सामुग्री अद्यावत करण्यात यावे. विद्युत खांब दुरूस्ती करून घेणे, रस्त्यांची डागडूजी पूर्ण करून घेणे, नदी व नाल्याकाठचे अतिक्रमण हटविणे, पावसाच्या पाण्याचे निचरासाठी सुव्यवस्था करणे, नगर परिषद क्षेत्रातील नाली सफाई करणे. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवणे, आपत्ती पूर्व सूचना देणारे संबंधित संस्थाचे दूरध्वनी क‘मांकाची यादी अद्ययावत करणे व त्याची वेळोवेळी पडताळणी करणे, आपत्ती विषयक पूर्वसूचनांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी Collector instruction दिल्या.
 
 
मागील वर्षी उमरखेड येथे पुराचे पाणी वाहत असताना पुलावरून बस नेण्याचा प्रयत्न केल्याने जीवित हानी झाली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पुलावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणी कोणीही पुराच्या पाण्यात जाणार नाही याबाबत स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करावे व संबंधितांना आवश्यक पुर्वसूचना द्याव्या. तसेच नदीत पाणी वाढल्यावर तेथे कोणी पोहायला जाणार नाही, याबाबत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्याचे Collector instruction सांगितले.
 
 
मान्सून कालावधीत विज पडून मोठ्या प्रमाणात जिवित हानी होत असते. हे टाळण्यासाठी भारतीय मौसम विभागाने तयार केलेले दामिनी अ‍ॅपचा वापर सर्वांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. दामिनी अ‍ॅपमध्ये जेथे वीज पडणार आहे त्या भागाची स्थलदर्शक माहिती विज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी दर्शविण्यात येते. त्यामुळे त्या भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पूर्वसूचना देवून खबरदारी घेण्याचा मेसेज करून जीवीत हानी टाळता येईल. विजा कडकडताना झाडाखाली उभे राहू नये व इतर खबरदारी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सर्वांना देण्याचे Collector instruction सांगितले.
 
 
विद्युत पुरवठा, दुरध्वनी, रस्ते व पुल इ. आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत सुरु राहतील, या हेतूने पुर्व तयारी करणे, अत्यावश्यक वस्तूंचा साठा ठेवणे, पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्रव्यांचे पूर्व नियोजन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणार्‍या औषधांचा साठा सुनिश्चित करणे, साथ रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवणे, जनावरांचे औषधांचा मुबलक साठा तसेच जनावरांसाठी पुरेसा चार्‍याचा साठा ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचे नियोजन करण्याचेही जिल्हाधिकारी यांनी Collector instruction यावेळी सांगितले.
 
 
बांधकाम सुरू असलेले वाहतुकीचे महत्वाचे मार्ग पावसाळ्यापुर्वी पुर्ण करणे व ते विहित कालावधीत पुर्ण होणे शक्य नसल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी बैठकीत पीपीटीद्वारे माहितीचे सादरीकरण केले. या बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी Collector instruction उपस्थित होते.