काँग्रेसचे एकीकडे चिंतन शिबीर दुसरीकडे पक्षात भूकंप

    दिनांक :14-May-2022
|
चंदीगड,
आज राजस्थानच्या उदयपूरमध्ये काँग्रेस Congress चिंतन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात अनेक मोठया नेत्यांनी हजेरी लावली आहे.  एकीकडे चिंतन शिबिरॅट काँग्रेस व्यस्त असताना मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 1फेसबुक पेजवर ऑनलाईन येत याबाबत माहिती दिली. काँग्रेसने नुकतीच जाखड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना सर्व पदांवरून हटवण्यात आले. दोन वर्षांपूर्वीही जाखड यांना हटवण्याची शिफारस करण्यात आली होती
 

gandhis 
 
चिंतन शिबीर केवळ औपचारिकता
सुनील जाखड यांना पक्षाच्या हायकमांडने एक दिवस आधीच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी पक्ष चिंतन शिबीर ही केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले. पंजाबमध्ये सर्वत्र परिस्थिती बिकट आहे. काँग्रेसच्या Congress काही नेत्यांचा पर्दाफाश करणे आवश्यक आहे. सुनील जाखड यांनी काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यांनी काँग्रेसच्या ताफ्याला गालबोट लावले. ते पुढे म्हणाले की, चिंतन शिबिराचा काहीही लाभ होणार नाही. पक्षाला स्वतःमध्ये सुधारणा करावी लागेल. पक्षाला चिंतन नाही चिंता करण्याची गरज नाही.