मंगळावर सापडले 'कोरडे तलाव'...काय म्हणाले शास्त्रज्ञ

    दिनांक :14-May-2022
|
नवी दिल्ली,
मंगळावर Mars पाणी असल्याची शक्यता आता खरी ठरत आहे. ताज्या संशोधनातही खगोलशास्त्रज्ञांना मंगळावर पाणी असल्याचे संकेत सापडले आहे. नुकतेच मंगळावर कोरड्या तलावाचे पुरावे सापडले असून त्यामुळे मंगळावर जीवसृष्टीची शक्यता बळकट झाली आहे. चीनच्या जुरोंग रोव्हरला मंगळावरील कोरड्या तलावाचे पुरावे सापडले आहेत. मंगळावर पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त काळ पाणी असल्याचे पुरावे रोव्हरला मिळाले आहेत. माहितीनुसार, जुरोंग रोव्हर 15 मे 2021 रोजी मंगळाच्या उत्तर गोलार्धात उतरला होता. ज्युरोंग रोव्हर 'युटोपिया प्लॅनिटिया' म्हणून ओळखल्या जाणार्‍या मैदानावर उतरवण्यात आले होते.
 
maras`  
 
 
यूएस स्पेस एजन्सी नासाचे व्हायकिंग 2 लँडर देखील 1976 मध्ये मंगळावरील यूटोपिया प्लॅनिटियावर उतरले होते. चिनी रोव्हरची सुरुवातीची मोहीम मंगळावरील प्राचीन जीवनाचे पुरावे शोधणे हे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून रोव्हर खनिजे, मंगळावरील वातावरण आणि मैदानावर पसरलेल्या पाण्याच्या आणि बर्फाच्या विस्तीर्ण क्षेत्राचे परीक्षण करत आहे. चीनच्या जुरोंग रोव्हरने मंगळावरील Mars लँडिंग साइटचे परीक्षण केल्यानंतर डेटा गोळा केला आहे. चिनी रोव्हरच्या डेटावरून असे दिसून येते की, युटोपिया प्लानिटिया प्रदेशात पाणी होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळ हा गरम आणि पाण्याने समृद्ध ग्रह होता. परंतु हळूहळू हा ग्रह बर्फाळ वाळवंटात बदलला. मंगळावर ज्या वेळेला पर्यावरणाच्या दृष्टीने वाईट काळ सुरू झाला त्याला 'अमेझोनियन युग' असे म्हणतात, जे सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वीचे आहे. खगोलशास्त्रज्ञांनी मंगळावरील खोऱ्यांमध्ये सापडलेल्या खनिजांबद्दल जुरोंग डेटाचे विश्लेषण केले. संकलित डेटामध्ये शास्त्रज्ञांना हायड्रेटेड सिलिका आणि सल्फेट देखील सापडले आहेत. संशोधनाचे प्रमुख लेखक, यांग यांनी सांगितले की, आम्हाला लँडिंग साइटवर हायड्रेटेड खनिजे आढळली. ही हायड्रेटेड खनिजे मंगळावरील पाण्याचा पुरावा देतात.
 
maras`