बिजापूर येथे आयईडी स्फोट

    दिनांक :14-May-2022
|

jhhikuoui 
 
बिजापूर,
IED blast छत्तीसगडमधील विजापूर केनेलस्नार येथील पांडेमुर्गा रोडवर नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट घडविण्यात आला आहे. यात एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याला नेल्सोनार येथे प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दंतेवाडा येथे पाठवण्यात आले. जवानांना इजा करण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा आयईडी पेरला IED blast होता, असे सांगण्यात येत आहे. नेल्सोनार हेमालापारा येथे गस्तीवर गेलेल्या जवानांना इंद्रावती नदीच्या काठावर बंगोली घाटाजवळ माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. यात कॉन्स्टेबल रामनाथ मौर्य यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.