पाकिस्तानने पकडली भारतीय मच्छिमारांची बोट

    दिनांक :14-May-2022
|
 
pakf
 
नवी दिल्ली,
Indian fishermen boat भारत आणि पाकिस्तानच्या सागरी सीमेवर पुन्हा तणावाचे वृत्त समोर आले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा एजन्सीने शुक्रवारी रात्री उशिरा भारतीय मच्छिमारांची बोट (अल किरमानी) पकडली. ही बोट पाकिस्तानच्या सागरी सीमेवर पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या बोटीवर आठ क्रू मेंबर्स होते. त्याचवेळी भारतीय मच्छिमारांवर गोळीबारही पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने केल्याचा आरोप आहे.