काश्मिरी पंडित राहुल बटच्या मृत्यूचा घेतला बदला

लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

    दिनांक :14-May-2022
|
श्रीनगर,
Kashmiri Pandit जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने अलीकडेच काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. परिसरात कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.सूत्रांच्या हवाल्याने, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा बडगाममधील काश्मिरी पंडित कर्मचारी राहुल बट यांच्या हत्येशीही संबंध आहे.

estifa 
 
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील बेरार येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले आणि Kashmiri Pandit सैनिकांनी त्याला प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असे अधिकाऱ्याने सांगितले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर काही वेळातच सुरक्षा दलांनी दुसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा केला. अशा प्रकारे आतापर्यंत झालेल्या चकमकीत एकूण दोन दहशतवादी ठार झाले आहेत. परिसरात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.