नवरी नटली अन् घोड्यावर बसली!...पहा video

वधूपित्याने दिला सामाजिक संदेश

    दिनांक :14-May-2022
|
देवळी,
Navri Natali नवरदेव घोड्यावरून वरात मिरवणूक काढत असल्याचे चित्रआतापर्यंत बघत आलो. मात्र, आता बाजी समसमानतेकडे वळू लागली आहे. शहरी भागातील हे लोन आता चक्क ग्रामीणमध्ये धडकले आहे. येथील एका नवरीची वाजत गाजत घोड्यावरून वरात काढल्याचे चित्र शुक्रवारी रात्री देवळीकरांनी अनुभवले. आज शनिवारी दिवसभर शहरात या अनोख्या वरातीची चर्चा रंगली सोबत समाज मध्यम आहेतच प्रोत्साहन द्यायला. येथील काळापूल परिसरातील रहिवासी आणि व्यवसायाने बांधकाम मिस्त्री असलेले गजानन तूळशीराम पाटील यांना आरती नावाची एकुलती एक मुलगी आहे. तिचा विवाह सावंगी रुग्णालय येथे सहाय्यक असलेले सुमित उमेकर रा. रामनगर वर्धा यांच्याशी 14 रोजी भोंग सभागृह येथे पार पडला.
 

nawri 
 
मुलगा आणि मुलीमध्ये भेद न माननाऱ्या गजानन पाटील यांनी आरतीचे लालनपोषण मुलासारखेच केल्यामुळे आरतीच्या लग्नावेळी तिची वरात घोड्यावरून काढण्याची कल्पना Navri Natali मुलीचे मामा दत्ता कडुकर रा. धामणगाव (रे.) यांनी वधूपित्याजवळ बोलून दाखवली. मुलीचा आतेभाऊ सुनील सुरजकर याने वरपक्षाला यासाठी सहमत केले. वधू आणि वर दोघांचेही शिक्षण फक्त मॅट्रिक आणि उच्च शालांत पर्यंत असूनही त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने आधुनिकतेचा देखावा करणाऱ्या उच्चशिक्षितांना तोंडात बोटं घालायला लावली. शुक्रवारी जानोसा ठिकाणी जाण्यासाठी वधू मंडळीने वाजत गाजत वरात काढून शहराच्या मुख्य चौकातुन घोड्यावरून नवऱ्या मुलीची मिरवणूक काढली. हे दृश्य पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली. अनेकांनी मोबाईलमध्ये या प्रसंगाचे चित्रीकरण केले.