दुबई,
संयुक्त अरब अमिरातचे (युएई) अध्यक्षपद Prince Sheikh Mohammed प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल् नाहयान यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. विद्यमान अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल् नाहयान यांचे शुक‘वारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर युएईच्या अध्यक्षपदी कोण? याकडे सार्या जगाचे लक्ष लागले होते. शेख खलिफा बिन झाएद अल् नाहयान यांच्यानंतर आता Prince Sheikh Mohammed शेख मोहम्मद बिन झायेद अल् नाहयान हे युएईचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत.
संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल् नाहयान यांचे शुक‘वारी 73 व्या वर्षी निधन झाले. शेख खलिफांच्या निधनानंतर युएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भारतातील उत्तरप्रदेश राज्यातही शनिवारी राजकीय अवकाश जाहीर करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा आजारी होते. त्यांचा सरकारी कार्यक‘मातील तसेच इतर ठिकाणचा वावर खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि युएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक‘मांपासून दूर राहिले. ते शेख झाएद यांचे सर्वांत मोठे अपत्य होते. जगातला सर्वांत उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे.